Join us

राज्याची रब्बी पेरणी कुठवर आली? आतापर्यंत सर्वाधिक पेरणी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 7:55 PM

खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती ?

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बीपेरणीला फटका बसला आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे ७८ टक्के इतकी आहे. हरभरा लागवड केवळ ७० टक्के झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.

रब्बी आशेवरही पाणी

राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना रडवणारा ठरला. त्याची भर रब्बी हंगामात निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीच्या आशेवरही पाणी फिरले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र ९७ टक्के झाले आहे. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर ऊसाच्या तोडणीनंतर हरभऱ्याच्या लागवडीतदेखील डिसेंबरअखेरपर्यंत वाढ होईल.- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे

किती क्षेत्रावर किती पेरणी?

- राज्यात यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर एवढे आहे. तर आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ७१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

- यंदा गव्हाचा पेरा घटला असून करडईचे शिवार फुलणार असल्याचे चित्र आहे.  यावर्षी गहू केवळ ८.३२ टक्के क्षेत्रात असून करडईची पेरणी ५७.२७ टक्के झाली आहे.

- करडईचे क्षेत्र १५ हजार २६६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारीचे क्षेत्र ८ लाख २० हजार हेक्टर असून हरभरा ७ लाख २६ हजार ८२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मका आणि गव्हाचा पेरा यंदा कमी असून ७९,३१२ हेक्टर व ८७ हजार २१६ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे.

- ज्वारीच्या पेरण्या ४६.७७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून हे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ३०.७० टक्के हरभरा पेरला आहे.

विभागनिहाय किती पेरणी झाली?

विभाग                                              टक्केकोकण (४,५७७)                            १३.८३नाशिक (८,७५७)                            ३.६९पुणे ( ५,३५,५४०)                           ४६.६०कोल्हापूर (१,९३,८४२)                    ४५.४१छत्रपती संभाजीनगर (२,४९,२९६)   ३३.६३लातूर ( ५,२८,२७२)                        ३,८७३अमरावती (१,४१,८६२)                    १९.०१नागपूर (६७,९३३)                           १६.०७     

टॅग्स :रब्बीलागवड, मशागतशेतकरीपेरणी