Lokmat Agro >शेतशिवार > विजेचे खांब, टॉवर्सपासून रहा दूर, वीज पडण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ!

विजेचे खांब, टॉवर्सपासून रहा दूर, वीज पडण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ!

Stay away from electric poles, towers, there is an increase in lightning incidents! | विजेचे खांब, टॉवर्सपासून रहा दूर, वीज पडण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ!

विजेचे खांब, टॉवर्सपासून रहा दूर, वीज पडण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ!

आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय मान्सून कालावधीत सोसाट्याचा वारा व विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय मान्सून कालावधीत सोसाट्याचा वारा व विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

शेअर :

Join us
Join usNext

मान्सून कालावधीत सोसाट्याच्या वारा, तसेच विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता असल्यामुळे उंच जागेवर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस,  सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्याची खांब, धातूचे कुंपणे, उघडी वाहने आणि पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात पेरणीपूर्व शेती महागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी, शेतमजूर दिवसभर शेतात कामे करीत असतात. त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. वाजराघातामध्ये अति वेगाने वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावत, जास्त किंता अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना होते.

वज्राघातामुळे मृत्यू

वीज सामान्यपणे उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान पूर्णपणे सुरक्षित नाही, मोठी बांधकामे, छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्ती वज्राघातामुळे जखमी किंचा मृत्यू पावतात.

विजेने जखमीवर उपचार केल्यास धोका नाही

वज्राघात बाधित, जखमी व्यक्तीस मदत करण्याची आवश्यकता असते, त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरू नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ, त्वरित मदत मिळाली तर प्राण वाचू शकतात. इजा झालेल्या व्यक्तीस हाताळताना श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान श्वास प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती  सिपिआर वापर करून सुरू ठेवावा.

इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवाव्यात बंद

गडगडाटी वादळ, अतिवेगाने वाहणार्‍या वादळवाऱ्यााचा अंदाज असल्यास विजेवर चालणाऱ्या वस्तु, इलेक्टिक व इलेक्ट्रिकल वस्तु आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवावीत. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकाव्यात.

वाहने सुरक्षित ठेवण्याची गरज

वाहने सुरक्षित ठिकाणी लावताना मोठी झाडे, तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावावीत. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावे व आपले डोळे दोन्हीं गुडघ्याच्यामध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटकल्या विद्युत तारांपासून दूर रहावे जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.

घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्यात

परिसरात वादळवारे, गडगडाटी वारे, विजा चमकत असल्यास घरात राहावे, घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे, घराभोवतालची उंच झाडे, कुंपण यापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे, घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवार्‍याच्या ठिकाणी, मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे, शेतीची अवजारे, मोटारसायकल आणि इतर वाहने यांच्यापासून दूर राहायला हवे.

हे करू नका

घराबाहेर असल्यास मेघगर्जनेवेळी विजा चमकताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, वाहनाच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागात संपर्क टाळावा, अधांतरी लटकणाऱ्याा, लोंबणाऱ्या केबल पासून लांब राहावे, विजा चमकताना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे. घराबाहेर असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाजवळ उभे राहू नये. सुरक्षितस्थळी आश्रय प्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

या ठिकाणी जाणे टाळावे

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागेवर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टावर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्याचे खांब, धातूंचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाइल व इतर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल उपकरणे, विद्युत जोडणीस लावू नये. अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा.

परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे. गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये, या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धूणे, कपड़े धुणे ही कार्य करू नये, प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा, धातुची तारे, खिडक्याची तावदाने, वायरिंग आणि प्लंबिंग नळ यांच्याशी संपर्क टाळावा.

 

Web Title: Stay away from electric poles, towers, there is an increase in lightning incidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.