Join us

रब्बी हंगामातील पेरणीसाठी धडपड, भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 11:46 AM

शेतकरी पेरणीच्या तयारीत...

खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने शेतकरी आहे, त्या पाण्यावर तुषार सिंचनद्वारे गहू, हरभरा पिके घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या काही शेतकरी गहू पेरणीसाठी शेतजमीन ओलवित आहे. परतूर तालुक्यात शेतकरी गहू पेरणीसाठी तुषार सिंचनद्वारे शेतजमीन ओली करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यंदा अत्यल्प पावसामुळे पाणीपातळीत वाढ झालेली नाही. निम्न दुधना प्रकल्पात ही जेमतेम २५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात बागायती क्षेत्र धोक्यात येण्याबरोबरच रबीतील गहू, हरभरा ही पिकेही येती की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत.

विजेचा लपंडाव, शेतकरी त्रस्त

तालुक्यातील शेतकरी आहे, त्या पाण्यावर रबी हंगामातील पिके घेण्याच्या तयारी आहेत. सध्या गहू, हरभरा या पिकांसाठी शेत भिजवणे काम सुरु आहे. वीज सतत गायब होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. भारनियमनामुळे विहिरी व बोअरवेलमध्ये असलेले पाणी देणे अवघड झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हरभरा एक दोन पाण्यात येत असला, तरीही गव्हाच्या पिकाला सहा ते सात पाण्याच्या पाळ्या लागतात. त्यामुळे गव्हाच्या पिकाला शेवटपर्यंतपाणी पुरते की नाही, याची शास्वती शेतकऱ्यांना नाही. तरीही शेतकरी अहोरात्र तुषार सिंचनचा वापर करून शेत भिजवून गहू व हरभऱ्याच्या पेरणीच्या तयारीत आहेत..

टॅग्स :रब्बीशेतकरीकृषी विज्ञान केंद्रशेतीकाढणी