शेतकऱ्यांचे दुःख हे सांगून कळत नाहीत तर ते अनुभवावे लागतात. हे दुःख केवळ शेतकऱ्यांनाच माहिती असतात. सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक आजी गहू काढलेल्या शेतामध्ये ओंब्या वेचताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडिओ खरंच निःशब्द करणारा आहे. त्यामध्ये एक तरूण भर उन्हातान्हात गव्हाच्या ओंब्या वेचणाऱ्या एका आजींचा व्हिडिओ चित्रित करत आहे. त्यांच्यातील संवाद माणसाला स्तब्ध करणारा आहे. तरूण विचारतो, "गव्हाच्या ओंब्यातून काही मिळतंय का नाही?" त्यावर आजी "नाही" असं उत्तर देत नाकारार्थी मान डोलावते. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ...
https://www.instagram.com/reel/C53nsXZvdu0/
"वाटाघाटी अन सत्ता संघर्ष या तापलेल्या राजकारणापासून दूर, IPL सामन्याच्या कॅमेऱ्यात न येणारं हे वास्तव चित्र. भर उन्हात पोट खळग्यासाठी गव्हाचं शेरूट चोळून एक-एक दाणा गोळा करणारी ही म्हातारी पाहून समजलं. हिच्यासाठी सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? आपल्या देशाचं नाव काय ? देश कोण चालवतो ? काहीच महत्वाचं नाही. महत्वाचे ते जे म्हणजे उद्याचं कसं? आज सगळे पोट भर खातील का? आज जगाच्या कारभारापुढे हिचं दुःख खूप मोठं वाटलं. खरं तर आज तिच्यासाठी पोटाच्या खळगीचा प्रश्न गंभीर आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला निःशब्द करणारा व्हिडिओ" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.