वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते.
औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड साहित्य, आयईसी (माहिती शिक्षण व संप्रेषण) यासाठी अनुदान दिले जाते.
तसेच उपक्रम काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन या घटकांसाठी लागवडधारकांना अनुदान दिले जाते. योजनेचा कालावधी २२ जून २०२३ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतचा दिलेला आहे.
विपणनासाठी पायाभूत सुविधा
या घटकांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदारास शंभर टक्के म्हणजे दहा लक्ष रुपये वाळवणी गृहाकरिता सहाय्यता अनुदान म्हणून दिले जाईल, तर खासगी क्षेत्रातील अर्जदार हा ५० टक्के अनुदानास पात्र राहील.
ग्रामीण संकलन केंद्र
घटकांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १०० टक्के (२० लक्ष रु.) अनुदान साहाय्यासाठी पात्र असतील आणि खासगी क्षेत्रातील अर्जदार ५० टक्के अनुदान सहाय्यासाठी पात्र असतील.
मूल्यवर्धन पायाभूत सुविधा
सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार हे १०० टक्के म्हणजे १५ लक्ष रुपये अनुदानासाठी पात्र राहील. खासगी क्षेत्रातील अर्जदार हा ५० टक्के अनुदान सहाय्यासाठी पात्र राहील.
असे मिळते अनुदान
सार्वजनिक क्षेत्राकरिता चार हेक्टर क्षेत्रावर बियाणे, जनुक केंद्राची स्थापना या बाबीसाठी २५ लक्ष रुपये, चार हेक्टर क्षेत्रावर आदर्श रोपवाटिका निर्मितीसाठी २५ लक्ष रुपये, एक हेक्टर क्षेत्रावर लहान रोपवाटिका निर्मितीसाठी ६ लक्ष २५ हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. खासगी क्षेत्राकरिता उपरोक्त बाबींसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के कमाल मर्यादा अनुक्रमे साडेबारा लक्ष, साडेबारा लक्ष व ३ लक्ष १२ हजार ५०० रुपये अनुदान देय आहे.
गुणवत्ता चाचणी
- आयुष, एनएबीएल या संस्थांमध्ये औषधी वनस्पतींची चाचणी करून घेतल्यास उत्पादकांना चाचणी शुल्काच्या ५० टक्के जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत शुल्क आकारले जाईल.
- गट किंवा क्लस्टरमध्ये ५० हेक्टर लागवडीसाठी प्रमाणन शुल्कापोटी पाच लक्ष रुपयाच्या मर्यादेत अनुदान देय राहील.
असा घ्या लाभ
- मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्लीच्या (एनएमपीबी) https://nmpb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- राष्ट्रीय वनस्पती मंडळ एनएमपीबी नवी दिल्ली यांना सादर करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करून शिफारसपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव राज्य औषधी वनस्पती मंडळ एसएमपीबी, पुणे यांच्याकडे सादर करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-४१० ००५
दुरध्वनी : ०२०-२५५३४८६०/२५५१३२२८
ईमेल : mshmpbmed@gmail.com