सन २०२४-२५ अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
तसेच कडधान्य मध्ये बीजप्रक्रिया ड्रम (Seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत Pulverizer व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (Oil extraction unit) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
सदर बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. Mechanization व Irrigation या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
२८ जानेवारी २०२५
अर्ज करण्यासाठी वेबसाईट
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी