विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सदरील योजना बँक कर्जाशी निगडित असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी अर्ज सादर करावेत. यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाइन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
गोदामाचा वापर साठवणुकीसाठी त्यांना योग्य व माफक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल दर आकारून करणे बंधनकारक आहे.
थेट खात्यावर रक्कम होणार जमा
पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने वर्ग करण्यात येईल. योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
येथे करा अर्ज
शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे ३१ जुलैपूर्वी सादर करावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान