Lokmat Agro >शेतशिवार > Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न

Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न

Success Story: What are you talking about? Lahne got an income of lakhs of rupees from pumpkin and mixed crops | Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न

Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न

जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेल्या अशाच एका मिश्र पिकाच्या प्रयोगातून २ महिन्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. वाचा सविस्तर (Success Story)

जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेल्या अशाच एका मिश्र पिकाच्या प्रयोगातून २ महिन्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. वाचा सविस्तर (Success Story)

शेअर :

Join us
Join usNext

Success Story :

नसीम शेख : 

टेंभुर्णी : दहिगाव येथील शेतकरी शंकरराव लहाने यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. तर शेतीही नेहमीच फायद्याची ठरते. हे त्यांनी विविध प्रयोगातून दाखवून दिले आहे.

मुख्याध्यापक म्हणून शंकरराव लहाने यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीला आपले सर्वस्व मानले. एखाद्या तरुण शेतकऱ्यालाही लाजवेल, अशा पद्धतीने त्यांनी नवनवीन प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.

सध्या त्यांनी मोसंबी फळबागेतील तीन एकर क्षेत्रात डांगरा (काशीफळ) चे आंतरपीक घेतले आहे. या डांगराच्या वेलींना ५ ते १५ किलोपर्यंतचे फळ लागले आहे. त्यातून त्यांनी २० टन डांगराचे उत्पादन घेतले आहे. ज्यातून तरुणांनी शेतीकडे उद्योग धंद्याप्रमाणे पाहिले पाहिजे.

इतके मिळाले उत्पन्न

लहाने यांनी केवळ दोन महिन्यांत अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे. सध्या हे डांगर जालना, अकोला, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या मार्केटमध्ये नेऊन विकत आहेत. यापूर्वी त्यांनी टोमॅटो, ॲपल बोर, शेवगा, सिडलेस लिंबू, हळद आदी पिकांतूनही भरघोस उत्पन्न घेतले आहे.

जर आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले, तर आजही शेती तोट्याची नाही. शेती करण्यासाठी वयाची अट नाही. आज वयाच्या सत्तरीत मी शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यातून भरघोस उत्पन्न घेत आहे. तरुण मुलांनी शेतीकडे उद्योग धंद्याप्रमाणे पाहिले पाहिजे. आजही शेती ही सर्वकाळ सर्वोत्तमच आहे. - शंकरराव लहाने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दहिगाव.

Web Title: Success Story: What are you talking about? Lahne got an income of lakhs of rupees from pumpkin and mixed crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.