Join us

Sugar Factory : राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा! ११ कारखान्यांना सोळाशे कोटींची थकहमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 9:16 PM

Sugar Factory : राज्य सरकारने या साखर कारखान्यांना थकहमी दिली असून २ साखर कारखान्यांना या यादीतून वगळले आहे. यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

Sugar Factory : आर्थिक कोंडीत अडकलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या संबंधित साखर कारखान्यांना हा दिलासा मिळाला असून विरोधात असलेल्या नेत्यांच्या कारखान्याला या यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, जे साखर कारखाने आर्थिंक डबघाईला आले आहेत अशा साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून कर्ज देण्यात येते. या कर्जासाठी राज्य सरकारकडून थकहमी आवश्यक असते. तर राज्य सरकारने राज्यातील ११ साखर कारखान्यांसाठी १ हजार ५९० कोटी रूपयांची थकहमी दिली आहे. तर विरोधी  पक्षात असलेल्या दोन नेत्यांच्या साखर कारखान्यांना थकहमीच्या यादीतून वगळण्यात आले आहे.  

कोणत्या कारखान्यांना दिली थकहमी?

  • लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (धारूर, बीड) - ९७ कोटी ७६ लाख
  • श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा - ९४ कोटी 
  • वृधेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी - ९३ कोटी 
  • लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा -१४० कोटी 
  • किसनवीर सहकारी साखर कारखाना, वाई, सातारा - ३२७ कोटी 
  • किसनवीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा, सातारा - १४० कोटी 
  • अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले - ९४ कोटी 
  • श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर - ३२७ कोटी 
  • श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा - ९४ कोटी 
  • अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई - ८० कोटी 
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा - १०३.४० कोटी  
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकऊस