Lokmat Agro >शेतशिवार > Sugar Factory : 'या' कारखाण्याची सर्वाधिक ३३०० रुपये उचल जाहीर तर अंदाज घेऊन उचल देण्याची इतरांची रणनीती

Sugar Factory : 'या' कारखाण्याची सर्वाधिक ३३०० रुपये उचल जाहीर तर अंदाज घेऊन उचल देण्याची इतरांची रणनीती

Sugar Factory: 'This' factory is announced to raise Rs. 3300 as the highest, while the strategy of others is to estimate and raise | Sugar Factory : 'या' कारखाण्याची सर्वाधिक ३३०० रुपये उचल जाहीर तर अंदाज घेऊन उचल देण्याची इतरांची रणनीती

Sugar Factory : 'या' कारखाण्याची सर्वाधिक ३३०० रुपये उचल जाहीर तर अंदाज घेऊन उचल देण्याची इतरांची रणनीती

Sugar Factory : साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप - चालू ठेवले आहे. 'जवाहर', 'पंचगंगा', 'दत्त' व 'गुरुदत्त' या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये 'पंचगंगा' कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन ३३०० रुपये आहे.

Sugar Factory : साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप - चालू ठेवले आहे. 'जवाहर', 'पंचगंगा', 'दत्त' व 'गुरुदत्त' या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये 'पंचगंगा' कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन ३३०० रुपये आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असला तरी केवळ चारच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करून गाळप - चालू ठेवले आहे. 'जवाहर', 'पंचगंगा', 'दत्त' व 'गुरुदत्त' या कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, यामध्ये 'पंचगंगा' कारखान्याची सर्वाधिक उचल प्रतिटन ३३०० रुपये आहे. शेजारील कारखान्यांची उचल आणि बँकांकडून मिळणारा पैसे याचा अंदाज घेऊनच इतरांचा निर्णय राहणार आहे.

शासनाने हंगाम २०२४-२५ साठी १०.२५ टक्के बेसीक उताऱ्यास प्रतिटन ३४०० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील १४ सहकारी व ९ खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाची उचलीलाही उशीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पहिल्या उचलीकडे लागल्या आहेत. 'दत्त- शिरोळ' व 'गुरुदत्त-टाकळीवाडी' या कारखान्यांनी उचल जाहीर करूनच तोडण्या सुरू केल्या.

प्रतिवर्षी एकरकमी उचल जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारीवर मोठा दबाव असे परंतु यंदा संघटनेचे वेगवेगळे नेते परस्पर कारखानदारांनाच अगोदर भेटून किती उचल द्यावी याचे मार्गदर्शन करू लागली आहेत. त्यामुळे एकत्रित संघटनेचा जो दबाव होता तो पूर्ण निष्फळ ठरला आहे.

हंगाम २०२४-२५ मधील एफआरपी, प्रतिटन

कारखाना२०२३-२४ उतारातोडणी-ओढणी देय एफआरपी 
आजरा १२.४२ ७८२ ३३३८ 
भोगावती १२.३२ ६११ ३४७६ 
राजाराम ११.६० ६६७ ३३८१ 
शाहू १२.०८ ७५९ ३२४८ 
दत्त १२.१४ ७२४ ३३०३ 
बिद्री १२.५५ ७९७ ३३६६ 
जवाहर १२.१५ ७४२ ३२८८ 
मंडलिक ११.५५ ७०५ ३१२७ 
कुंभी १२.८३ ६४८ ३४०८ 
पंचगंगा १२.७० ७०८ ३५०५ 
शरद १२.०६ ७४० ३२६० 
वारणा ११.२२ ६८३ ३०४८ 
गायकवाड ११.६१ ७८३ ३०६९ 
डी. वाय. पाटील १२.३८ ७४२ ३३६५ 
दालमिया १३.३५ ८०३ ३६२६ 
गुरुदत्त १२.४६ ८०९ ३३२५ 
युको क्रेन १२.७२ ८२५ ३३९५ 
आलेम १२.४६ ७७९ ३३५५ 
संताजी घोरपडे ११.७२ ८६१ ३०२७ 
फराळे १२.५१ ९७९ ३१७१ 
गडहिंग्लज १२.४९ ६४५ ३४७१ 

यांनी केली उचल जाहीर

• पंचगंगा (रेणुका शुगर्स) इचलकरंजी - ३३००
• गुरुदत्त, टाकळीवाडी - ३१५०
• जयाहर, हुपरी - ३१५०
• दत्त, शिरोळ - ३१४०

'स्वाभिमानी'ची ३७०० रुपयांची मागणी

'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने यावर्षी प्रतिटन ३७०० रुपये दराची मागणी केली आहे. साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर त्यांची सध्या मागणी रेटण्याचा प्रयत्न असून, आंदोलनाची धार किती राहणार यावरच, पहिल्या उचलीचे भवितव्य अवलंबून राहणार हे निश्चित आहे.

हेही वाचा : Lek Ladki Yojana : मुलींना मिळणार एक लाख रुपये; लवकरात लवकर 'येथे' करा अर्ज

Web Title: Sugar Factory: 'This' factory is announced to raise Rs. 3300 as the highest, while the strategy of others is to estimate and raise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.