Lokmat Agro >शेतशिवार > साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

Sugar mills should focus on production of alternative biofuels along with sugar | साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शेअर :

Join us
Join usNext

ग्रीन हायड्रोजनसारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून, भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळीउपस्थित होते.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनुझुनवाला, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यावेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, आपल्या देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझीलसारख्या देशावर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही.

इथेनॉल व तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक संशोधन व्हावे

• साखर उत्पादनावर अवलंबून राहणे परवडणारे नसल्यामुळे साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे.

• देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनसारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

• जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी' या विषयावरील या जागतिक परिषदेला २७ देशांमधील २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Web Title: Sugar mills should focus on production of alternative biofuels along with sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.