Join us

साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 9:20 AM

भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ग्रीन हायड्रोजनसारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून, भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळीउपस्थित होते.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनुझुनवाला, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यावेळी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, आपल्या देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझीलसारख्या देशावर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही.

इथेनॉल व तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक संशोधन व्हावे

• साखर उत्पादनावर अवलंबून राहणे परवडणारे नसल्यामुळे साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे.

• देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनसारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.

• जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी' या विषयावरील या जागतिक परिषदेला २७ देशांमधील २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

टॅग्स :साखर कारखानेऊसग्रीन प्लॅनेट