Join us

Sugar Price in India : केंद्राकडून सप्टेंबरचा साखर कोटा जाहीर.. कसा राहील दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:51 AM

केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार असून, प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांनी दरात वाढ शक्य आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ३१ ऑगस्टला सप्टेंबर २०२३ चा कोटा जाहीर केला होता. तो २५ लाख टन कोटा होता. सणासुदीच्या पार्श्वभूमीचा विचार करून साखरेचा कोटा जाहीर केला जातो. त्यामुळे गेल्या वर्षी मागणी वाढूनही खुल्या बाजारात साखरेचे दर स्थिर राहिले होते.

मात्र, यंदा सप्टेंबर महिन्याचा कोटा २३.५ लाख टन दिला असून, तो मागच्या तुलनेत दीड लाख टनाने कमी आहे. त्यामुळे सध्या बाजारात साखरेला तेजी राहिली टनाने कमी आहे. त्यामुळे सध्या बाजारात साखरेला तेजी राहिली.

साखरेच्या दरवाढीची ही प्रमुख कारणे• सप्टेंबर २०२४ चा कोटा वाढण्याऐवजी कमी.• सप्टेंबरपासून रेल्वेने मालवाहतुकीत ४० ते ५० रुपये सूट दिल्याने आसाम, पश्चिम बंगालमध्ये मागणी वाढणार.• गणेशोत्सव, नवरात्रौत्सवामुळे मागणीत वाढ होणार.• बहुतांश राज्यांत अतिरिक्त साखर शिल्लक नाही.

घाऊक बाजारात ३७०० रुपयांपर्यंत दर शक्यकोटा जाहीर झाल्यानंतर तातडीने मार्केट प्रतिक्विंटल ३५६० वरून ३६५० रुपयांपर्यंत दर वाढले आहेत दर ३७०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गेल्या सहा वर्षातील विक्रीसाठी दिलेला साखर कोटा (लाख टन)

वर्षसप्टेंबरऑक्टोबर-सप्टेंबर
२०१८-१९१९.५०२४७.००
२०१९-२०२२.००२४३.००
२०२०-२१२२.००२५६.००
२०२१-२२२३.५०२६३.५०
२०२२-२३२५.००२७६.५०
२०२३-२४२३.५०२९१.५०

केंद्राने सप्टेंबरचा कोटा कमी दिला, त्याचबरोबर रेल्वेने मालवाहतुकीचे दर कमी केल्याचा एकत्रित परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसतो. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरात वाढ होणे अपेक्षित आहे. - पी. जी. मेढे (साखर उद्योग अभ्यासक)

टॅग्स :साखर कारखानेकेंद्र सरकारसरकारबाजार