Join us

साखरेचे भाव गेले सहा वर्षांच्या उच्चांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 7:00 PM

टोमॅटो आणि कांद्यानंतर आता साखरेचे भाव वाढले आहेत. मागील १५ दिवसांत साखरेचे दर 3. उच्च्चांकावर गेले आहेत. सूत्रांनी सांगितले ...

टोमॅटो आणि कांद्यानंतर आता साखरेचे भाव वाढले आहेत. मागील १५ दिवसांत साखरेचे दर 3. उच्च्चांकावर गेले आहेत. सूत्रांनी सांगितले की, मान्सूनला ३ महिने होऊनही देशाच्या अनेक भागांत अजून पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे देशातील प्रमुख साखर उत्पादक धास्तावले आहेत. 

पुढील साखर हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे भाव झपाट्याने वाढत आहेत. यावर उपाय योजना न केल्यास ऐन सणासुदीच्या हंगामात साखरेचे भाव आणखी वाढू शकतात. टोमॅटो आणि कांद्याच्या वाढत्या भावापासून दिलासा मिळालेला असताना साखरेने नवे संकट उभे केले आहे.

₹३७,७६० प्रतिटन

• मंगळवारी साखरेचे दर वाढून ३७,७६० रुपये (४५४.८० डॉलर) प्रतिटन झाले. ऑक्टोबर २०१७ टक्के वाढून ६ महिन्यांच्या नंतरचा हा उच्चांक आहे.

• भारतातील साखरेचे दर जागतिक पांढया साखरेच्या तुलनेत मात्र मात्र ३८ टक्के कर्मी आहेत.

उत्पादन ३.३ % घटणार

■ एका अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या नव्या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन ३.३ टक्के घटून ३१.७ दशलक्ष टनांवर येऊ शकते.

■ कारण देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ५० टक्के साखर उत्पादित करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुरेसा पाऊस पडलेला नाही.

समभाग तेजीत

साखरेचे भाव वाढताच बुधवारी साखर उत्पादक कंपन्यांचे समभाग ८ टक्के वाढले. राणा शुगर, श्री रेणुका शुगर्स, द उगार शुगर, द्वारिकेश शुगर, ईद पॅरी, त्रिवेणी इंजिनियरिंग अँड इंडस्ट्रीज या कंपन्यांचे समभाग १.४ टक्के ते ८ टक्के वाढले.

निर्यातीवरही अंकुश ?

बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, भाव वामुळे साखरेच्या निर्यातीवर सरकार अंकुश लावू शकते. चालू हंगामात ६.१ दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीलाच परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेती क्षेत्रपैसा