छत्रपती संभाजीनगर : यंदा गतवर्षीपेक्षा छत्रपती संभाजीनगर विभागात साखरेचे उत्पादन (Sugar Production) २२ लाख क्विंटलने कमी झाले आहे. गतवर्षी ८८.२२, तर यंदा ६४.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हे तीन जिल्हे व खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा समावेश आहे. यंदा धुळे जिल्ह्यातील एकही कारखाना सुरू नव्हता. (Sugar Production)
नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील मिळून तीन साखर कारखाने चालू होते. उर्वरित १९ कारखाने छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील आहेत. साधारणपणे १५ नोव्हेंबर २०२४ पासून गळीत हंगाम सुरू झाला होता. तो २१ मार्च २०२५ पर्यंत चालला.
या काळात ८०.९३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. गतवर्षी हेच गाळप ९८.९२ लाख मे. टन इतके झाले होते. यावर्षी गाळप १८ लाख मे. टनाने कमी झाला. यावर्षी साखरेचे उत्पादन ६४.८६ लाख क्विंटल इतकेच झाले. (Sugar Production)
मागील वर्षी हे उत्पादन ८८.२२ लाख क्विंटल झाले होते. पुढील वर्षीचा गाळप हंगाम चांगला राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ८०.९३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप २१ मार्च २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. हाच आकडा गेल्या वर्षात ९८.९२ लाख मेट्रीक टन इतका होता. (Sugar Production)