Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing: How much sugar is produced in the 'Manjara' factory? Read in detail | Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : शेतकऱ्यांना शेतीच्या उन्हाळी कामांसाठी मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने जमा केला आहे. वाचा सविस्तर (Manjara factory)

Sugarcane Crushing : शेतकऱ्यांना शेतीच्या उन्हाळी कामांसाठी मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने जमा केला आहे. वाचा सविस्तर (Manjara factory)

शेअर :

Join us
Join usNext

Sugarcane Crushing : शेतकऱ्यांना शेतीच्या उन्हाळी कामांसाठी मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाला १०० रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे दुसरा हप्ता लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने (Manjara factory) पुरवठादारांच्या ऊस खात्यावर जमा केला आहे. (Sugarcane Crushing)

राज्यातील सहकारी साखर उद्योगात दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा (Manjara factory) यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे झाला आहे. (Sugarcane Crushing)

मांजरा परिवाराचे प्रमुख तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी यंदाच्या हंगामात कारखान्याकडे ((Manjara factory) ) गाळपास उसाला किमान ३ हजार रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले. कारखान्याने यापूर्वी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे पैसे अदा केले आहेत.

आता शेतकऱ्यांना शेती कामांस मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊस पुरवठादारांच्या खात्यावर शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे दुसरा अंतरिम हप्ता बुधवारी जमा केला आहे. (Sugarcane Crushing)

तसेच जाहीर केल्याप्रमाणे लवकरच उर्वरित ऊसदरही अदा केला जाणार आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली. उसाला दुसरा शंभर रुपयांचा हप्ता दिल्याने शेतकरी सभासदांकडून आनंद व्यक्त होत आहे. (Sugarcane Crushing)

३ लाख १६ हजार क्विंटल साखर उत्पादन

* कारखान्याने यंदाच्या हंगामात ३,२३,६०१ मे. टन उसाचे गाळप करून ३,१६,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

* कारखान्याने वीज वितरण कंपनीस १,९१,२९,५४३ केडब्ल्यूएच विजेची निर्यात केली आहे. ज्यूस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा ११.८६६ टक्के प्राप्त झाला आहे.

* अर्कशाळा विभागाकडून ६२,२४,६२० लिटर आर. एस. व ४४,४८,७५६ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून उसाची वाढ कमी असतानाही यावर्षी गळीत हंगाम यशस्वी झाला आहे.

उसाचा हप्ता बँक खात्यावर जमा

यंदाच्या हंगामात कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क करावा व बिलाची रक्कम घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांनी केले आहे.

हे ही वाचा सविस्तर: Success Story: विदर्भातील युवा शेतकरी स्टार्टअपमधून करतात कोटींची उलाढाल वाचा त्यांच्या यशाचे गमक

Web Title: Sugarcane Crushing: How much sugar is produced in the 'Manjara' factory? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.