Join us

ऊस गाळप सुसाट; राज्यात ९ कोटी ९ लाख मेट्रिक टन गाळप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 2:54 PM

पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल, असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून, राज्यात ९ कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे.

अरुण बारसकरसोलापूर : पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल, असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून, राज्यात ९ कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे.

पाच लाखांहून अधिक गाळप तब्बल ६६ कारखान्यांनी केले असून, १५ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप राज्यातील तीन कारखान्यांनी केले आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १३ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ९०९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करीत ९५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्याचा साखर उतारा ९.९१ होता, तर यंदा १०.३ टक्क्यांपर्यंत आहे.

५ लाख मेट्रिक टन - ६६ साखर कारखान्यांचे गाळप

कारखाना गाळप (मेट्रिक टनांत)
बारामती अॅग्रो १९ लाख
दौंड शुगर१६ लाख
विठ्ठलराव शिंदे कारखाना१५ लाख
कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना१४.२५ लाख
इंडिकॉन डेव्हलपर्स१२.२५ लाख
यशवंतराव मोहिते कृष्णा रेठरे कारखाना१२ लाखांहून अधिक

सर्वाधिक गाळप सोलापूर जिल्ह्यात (आकडे मेट्रिक टनांत)• सोलापूर - १४६ लाख• कोल्हापूर - १३२ लाख• पुणे - ११० लाख• अहमदनगर १०६ लाख

साखर उतारा किती?गाळपामध्ये राज्यात प्रथम असलेल्या बारामती अॅग्रोचा साखर उतारा केवळ ९ टक्के आहे. दौंड शुगरचा उतारा ९.६३ टक्के, विठ्ठलराव शिदे कारखान्याचा साखर उतारा ९.४४ टक्के इतका आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीपाऊसकोल्हापूरसोलापूरपुणे