Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Factory FRP : FRPची रक्कम थकवल्याने ७ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून कारवाई!

Sugarcane Factory FRP : FRPची रक्कम थकवल्याने ७ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून कारवाई!

Sugarcane Factory FRP Sugar Commissionerate action against 7 sugar factories due to default of FRP amount! | Sugarcane Factory FRP : FRPची रक्कम थकवल्याने ७ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून कारवाई!

Sugarcane Factory FRP : FRPची रक्कम थकवल्याने ७ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून कारवाई!

Sugarcane Factory RRC : आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Sugarcane Factory RRC : आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Sugarcane Factory RRC : राज्यातील साखर गाळप हंगाम संपून अडीच महिने उलटले तरीही अजून काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. म्हणून साखर आयुक्तालयाने या कारखान्यांवर कारवाई केली आहे. आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, शेतकऱ्याच्या शेतातून ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे आवश्यक असते. पण बरेच साखर कारखाने पैसे देण्यासाठी उशीर करतात. म्हणून साखर आयुक्तालय या कारखान्यांवर RRC (Revenue Recovery Certificate) कारवाई करते. साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांसाठी दिलेला हा निर्वाणीची इशारा समजला जातो.

सदर कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी कारखान्यांकडून थकीत रक्कम वसूल करत असतात. तरीही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येते. पण ऊस तुटून गेल्यानंतर दोन महिने पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो.

RRC कारवाई करण्यात आलेले साखर कारखाने
१) मातोश्री लक्ष्मी शुगर कोजनरेशन इंड. लि. रूद्देवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
२) विठ्ठल रिफाईंड शुगर्स लि. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापूर
३) श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. आदिनाथनगर, शेलगाव, भाळवणी, पो. जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर
४) गोकुळ शुगर्स लि. (श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाने लि.) नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
५) कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
६) भीमाशंकर शुगर मिल्स लि. मु. पो. पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव
७) जयहिंद शुगर प्रा. लि. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर

Web Title: Sugarcane Factory FRP Sugar Commissionerate action against 7 sugar factories due to default of FRP amount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.