Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane FRP 2024-25 : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी एफआरपी प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण वाचा सविस्तर

Sugarcane FRP 2024-25 : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी एफआरपी प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण वाचा सविस्तर

Sugarcane FRP 2024-25 : Sugarcane Rate Payment Policy as FRP for Sugarcane Season 2024-2025 Read Details | Sugarcane FRP 2024-25 : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी एफआरपी प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण वाचा सविस्तर

Sugarcane FRP 2024-25 : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी एफआरपी प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण वाचा सविस्तर

केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे.

केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र शासनाने दि. २७/०२/२०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे.

सदर बदल आणि त्यासंदर्भातील दि.२६/१२/२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश विचारात घेता, २०२४-२०२५ हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

गाळप हंगाम २०२४-२०२५ व त्यापुढील हंगामांचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अ. क्र.महसुल विभागाचे नावहंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत एफ.आर.पी. ऊस दर अदा करण्यासाठी आधारभूत धरावयाचा साखर उतारा
पूणे व नाशिक१०.२५%
छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर९.५०%

वरीलप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन २०२४-२०२५ च्या हंगामासाठी एफ.आर.पी. च्या धोरणात दि.२७/०२/२०२४ च्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफ.आर.पी. दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊस दर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करण्यात येतील.
१) हंगाम २०२४-२०२५ करीता बेसिक १०.२५% साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल रू. ३४०/-
२) साखर उतारा १०.२५% च्या वरील प्रत्येक ०.१% उतारा वाढीसाठी प्रिमियम दर रू. ३.३२ प्रति क्विंटल.
३) साखर उतारा १०.२५% पेक्षा कमी परंतु ९.५०% पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी, प्रत्येक ०.१% उतारा घटीसाठी रू. ३.३२ प्रति क्विंटल तथापि, साखर उतारा ९.५०% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर रू. ३१५.१० प्रति क्विंटल.

Web Title: Sugarcane FRP 2024-25 : Sugarcane Rate Payment Policy as FRP for Sugarcane Season 2024-2025 Read Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.