कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या उसास प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू वर्षी पहिली उचल ३७०० रुपयांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.
साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार, संघटनांची बैठक होणार आहे. शेतकरी अनेक साखर कारखानदार दर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत.
याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त खेमनार यांचे लक्ष वेधले होते. खेमनार यांच्या आदेशानुसार बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत जर तोडगा नाही निघाला तर 'स्वाभिमानी' आंदोलनाची कोणती भूमिका घेणार याकडे उत्सुकता लागून राहिली आहे.
अधिक वाचा: Farmer Success Story : आखाती देशांमध्ये मागणी असणाऱ्या ढोबळी मिरचीतून प्रत्येक तोड्याला लाखाची कमाई