Lokmat Agro >शेतशिवार > Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी

Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी

Sugarcane Galap : Sugarcane shortage for crushing; This is how sugarcane is giving to factory | Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी

Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी

गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे.

गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नातेपुते: यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाचा चाऱ्यासाठी वापर केला गेला. साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला.

गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे.

दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस मिळवताना कारखाने वेगवेगळे फंडे वापरत आहेत. पाहुण्यांचे पाहुणे शोधून त्यांचा ऊस मिळविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

"गेटकेन"चा ऊस मिळविण्यासाठी कारखाने अनेक फंडे वापरताना दिसत आहेत. यामुळे जो कारखाना जास्त दर देईल, त्यालाच ऊस देणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होत असली तरी कारखाण्याकडून उसाची पळवापळवी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

जास्त भाव देऊनही ऊस मिळविण्यासाठी अडचण निर्माण झाल्यास ऊस तोडणीस अपरिपक्व होण्याच्या अगोदरच तोडून नेऊ, पण आम्हालाच ऊस द्या, असे प्रकारही होताना दिसत आहे.

कोवळा ऊस तोडून साखर उताऱ्यावर परिणाम होत असला तरी आपल्या कारखाण्याचे जास्तीत जास्त गळीत व्हावे म्हणून कोणताही म्हणजे कमी उतारा असलेला ऊसही तोडून नेला जात आहे.

ऊस मिळवण्यासाठी कारखान्याचे शेतकी अधिकारी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या घेऊन कार्यक्षेत्राबाहेर फिरत आहेत.

नोंद एकीकडे, ऊस दुसरीकडेच
काही ठिकाणी तर एका कारखान्याकडे नोंदवलेला व करार केलेला ऊस दुसराच कारखाना तोडून नेत आहे. उसाची कमतरता अशीच राहिली तर साखर कारखाने चालविणे अवघड होऊन बसणार आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस घेण्यास कारखान्यांना पुन्हा बंद करण्याची वेळ येणार असून, शासनाला झोनबंदी लागू करावी लागणार आहे.

पुढच्या वर्षीही सकट कायम
यंदा उसाची लागवड चांगली झाली असून पुढील वर्षीही गळीत हंगामासाठी उसाची कमतरता भासेल, असे वाटत नाही. आज उसाची लागवड किती होणार, तसेच शेतकरी खोडवा ठेवणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी पुढच्या वर्षी ऊस जास्त झाल्यास उसाचे संकट गडद होणार आहे.

अधिक वाचा: पुणे जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली; सोमेश्वर साखर कारखान्याकडून पहिली उचल जाहीर

Web Title: Sugarcane Galap : Sugarcane shortage for crushing; This is how sugarcane is giving to factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.