Join us

Sugarcane Production : नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:34 IST

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील उत्तम धनाजी शिरतोडे यांनी नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

देवराष्ट्रे: देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील उत्तम धनाजी शिरतोडे यांनी नऊ गुंठे क्षेत्रामध्ये तब्बल ३० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी त्यांनी खर्चसुद्धा मर्यादित केला आहे. 

कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न घेतले तरच आजच्या घडीला शेती नफ्यामध्ये येईल. उत्पादन काढण्याच्या स्पर्धेमध्ये खते व औषधे या दुकानदारांचीच मोठी भरभराट भर होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या हाती मात्र भोपळा शिल्लक राहात आहे. द

वराष्ट्रे येथील शिरतोडे यांनी उसाची लागण केल्यानंतर त्यासाठी सुरुवातीला मेहनत लागण व नंतर उपयुक्त खते व स्वतःचे कष्ट या जिवावर प्रतिगुंठा तीन टनपेक्षा अधिक उत्पन्न घेतले आहे.

सुनियोजित पद्धतीने खते दिल्यानंतर ऊस चांगल्या पद्धतीने वाढला. उसाची वाढ ५६ कांडीपर्यंत झाली होती. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेतल्यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.

अधिक वाचा: इथेनॉल दराचा निर्णय साखर उद्योगासाठी फायद्याचा की तोट्याचा? 'एफआरपी'च गणित कसं जुळवणार?

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीपीकसांगली