Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर

Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर

Sugarcane Season Maharashtra : When will sugarcane season start this year? what sugar commissioner is saying read in detail | Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर

Sugarcane Season Maharashtra : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार? काय म्हणता आहेत साखर आयुक्त वाचा सविस्तर

दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

मात्र, २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे हंगाम २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.

या लांबलेल्या हंगामामुळे साखर, तसेच इथेनॉलच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेजारील गुजरात व कर्नाटकात हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची वानवा जाणवणार आहे.

गेल्यावर्षी साखर हंगाम दिवाळीनंतरच एक नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे यंदादेखील दिवाळीनंतरच हंगाम सुरू करावा, अशी मागणी साखर उद्योगातून करण्यात येत होती. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी ऊस गाळपाला सुरुवात होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसारच कारखान्यांना गाळप परवाना वितरित करण्यात येईल, असे ठरले होते. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

ऊस तोडण्यासाठी मजूर प्रामुख्याने मराठवाड्यातून अन्य विभागात येत असल्याने १५ नोव्हेंबर रोजी हंगाम सुरू झाल्यास या मजुरांना मतदान करता येणार नाही, या भीतीपोटी साखर हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या तारखेला हंगाम सुरू करायचा असल्यास त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे; मात्र हंगाम मतदानानंतरच सुरू करावा, अशी मागणी काही संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती.

त्यानुसार राज्य सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम २५ नोव्हेंबरनंतरच सुरू करावा, अशी परवानगी आयोगाकडे मागितली आहे. यासंदर्भात अद्याप आयोगाने कोणतीही हालचाल केलेली नाही.

दुसरीकडे, हंगाम लांबल्यास साखर, तसेच इथेनॉलच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उशिरा हंगाम सुरू झाल्यास राज्यातील ऊसतोड कामगार शेजारील कर्नाटक व गुजरात राज्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे अवघड होऊ शकते.

त्यामुळेच हंगाम १५ नोव्हेंबर रोजीच सुरू करावा, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे; मात्र मतदानानंतरच हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू केल्यास त्यासाठी साखर कारखान्यांना गाळप परवाने द्यावे लागणार आहेत.

मात्र, हंगाम लांबेल अशा शक्यतेने अद्याप एकही परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या धामधमुमीनंतरच राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे.

जर हंगाम वेळेत सुरू झाला, सुरू करण्याची परवानगी मिळाली तर परवाने तयार आहेत. गाळपासाठी आवश्यक असणारी रक्कम बहुतांश कारखान्यांनी आयुक्तालयाकडे जमा केली आहे. अशा कारखान्यांचे परवाने तयार करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून हंगाम सुरू करण्यासंदर्भात आदेश आल्यानंतर हे परवाने तातडीने वितरित करण्यात येतील - कुणाल खेमनार, आयुक्त, साखर

Web Title: Sugarcane Season Maharashtra : When will sugarcane season start this year? what sugar commissioner is saying read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.