Lokmat Agro >शेतशिवार > तर शेतकऱ्यांचा ऊस पाच हजारांनी विकला जाईल, कसा? ते वाचा

तर शेतकऱ्यांचा ऊस पाच हजारांनी विकला जाईल, कसा? ते वाचा

sugarcane will get upto 5000 rupees per ton rate, how | तर शेतकऱ्यांचा ऊस पाच हजारांनी विकला जाईल, कसा? ते वाचा

तर शेतकऱ्यांचा ऊस पाच हजारांनी विकला जाईल, कसा? ते वाचा

ऊसाला पाच हजार रुपये (sugarcane rate) पर्यंतचा प्रति टन भाव मिळू शकतो का? ऊस अभ्यासकांनी या संदर्भात एकत्र येऊन मांडलेले गणित.

ऊसाला पाच हजार रुपये (sugarcane rate) पर्यंतचा प्रति टन भाव मिळू शकतो का? ऊस अभ्यासकांनी या संदर्भात एकत्र येऊन मांडलेले गणित.

शेअर :

Join us
Join usNext

साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांना मिळणारा भावः 4950.8 रू. प्रती टन
एका साखर कारखान्याला होणारा फायदाः 262.2 कोटी रू.
सरकारला मिळणाऱ्या महसुल मधील वाढः 26,272 कोटी रू. प्रती वर्ष

कसा व किती हे खालील प्रमाणे -  सूत्रात मांडले आहे. 

आम्ही व श्री.  दत्ताराम रासकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ म्हस्कोबा सा. का. आणि श्री. साहेबराव खामकर, संस्थापक-अध्यक्ष, नवदीप सोशल फाउंडेशन, व मा. कार्यकारी संचालक, प्रतापगड व थेऊर साखर कारखाना ह्यांच्या संयुक्तिक प्रयत्न व पुढाकारातून 15 सदस्यांची ‘टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी’ स्थापन झाली.  या कमिटी सभासदांची ‘साखरेला द्विस्तरीय भाव’  या एकाच विषयावर पाच वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. त्यातून ऊसाला पाच हजार रुपये प्रति टनापर्यंत भाव देता येईल याचे एक गणितच मांडले.

शेतकऱ्यांचा फायदा:
समजा एखाद्या कारखान्याची वर्षाची उत्पादीत साखर आहे: 1,90,000 मेट्रिक टन= 1.9 लाख टन

साखरेची एकूण विक्री किंमत : 
i) घरगुती वापर (Domestic): 20% प्रमाणे  = 1.9 X 0.20 = 0.38  लाख टन
साखरेचा विक्री भाव: 40 रु / किलो दराने
साखरेचा विक्री रु : 0.38 X 40000/100= 152 कोटी रु 
ii) औद्योगिक वापर (Industrial) : 80% प्रमाणे = 1.9 X 0.80 = 1.52 लाख टन
साखरेचा विक्री भाव: 65 रु / किलो दराने
साखरेचा विक्री रु:  1.52 X 65000/100= 988 कोटी रु
iii) एकूण विक्री: 152 + 988=1140 कोटी रु  
b) उसाचे गाळप: साखर उतारा  11%  प्रमाणे = 1,90,000 /0.11= 17,27,272.7 मेट्रिक टन = 0.1727  कोटी मेट्रिक टन 
c ) एफआरपी (FRP) किती - जुन्या  पद्धती प्रमाणे 
सन 2022-23 गाळप हंगाम साठी 10.25% साठी एफआरपी 3050 रु / टन आहे  व प्रत्येक 1 टक्का वाढी       साठी 305 रु जास्त. 
0.75  टक्क्या साठी  305 X 0.75 = 228.75 रु / टन जास्त
एफआरपी= 3050 + 228.75= 3278.7  रु / टन 
d) आरएसएफ (RSF) किती : नवीन पद्धती प्रमाणे

सध्याच्या कायदेशीर तरतुदी नुसार साखर विक्री मूल्याच्या 75 टक्के किंवा साखर व प्राथमिक उपपदार्थ म्हणजेच मळी, भुसा आणि प्रेसमड विक्री मूल्याच्या 70% या पैकी जे जास्त असेल तो त्या कारखान्याचा आरएसएफ दर असेल. व कारखान्याचा आरएसएफ दर एफआरपी दरा पेक्षा जास्त निघत असेल तरच तो शेतकऱ्यांना देय होतो. 
i) साखर विक्री मूल्याच्या 75 टक्के:  1140 X 0.75= 855 कोटी रु 
ii ) प्राथमिक उपपदार्थ विक्री उत्पन्न :

बगॅस 4% @ 1500 रु / टन= 0.1727 x 0.04 X 1500 = 10.36 कोटी रु

मळी (मोलॅसिस) 4% @ 6500 रु / टन= 0.1727 X 0.04 X 6500= 44.9 कोटी रु

प्रेसमड 4% @ 300 रु / टन= 0.1727 X 0.04 X 300= 2.07 कोटी रु

iii) साखर व प्राथमिक उपपदार्थ विक्री= 1140+10.36+44.9+2.07= 1197.33 कोटी रु

एकूण विक्री मूल्याच्या 70 टक्के = 1197.33 X 0.70 = 838.1 कोटी रु 

iv) दोन्ही पैकी जास्त आहे 855 कोटी रु 

v) याचा अर्थ कारखान्याचा आरएसएफ दर = 855 /0.1727=  4950.8 रु / टन
e) कारखान्याचा आरएसएफ दर हा एफआरपी दरा पेक्षा जास्त आहे. 
f) नवीन पद्धती प्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार भाव : 4950.8  रु / टन 
g) जुन्या पद्धती प्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार भाव: 3278.7 रु / टन 
h) प्रत्येक शेतकऱ्याला जादा  मिळणारा भाव: 4950.8 - 3278.7= 1672.1 रु / टन 
 j) शेतकऱ्यांना एकूण मिळणारी जादा रक्कम: 1672.1 X 0.1727= 288.8 कोटी रु (एका कारखान्यासाठी) 

साखर कारखान्यांना होणार फायदा 
a)  कारखान्याला जुन्या दरा प्रमाणे मिळणारी रक्कम : 1.9 X 31000/100= 589 कोटी रु   
(साखरेचा विक्री भाव: 31 रु / किलो दराने)
b) नवीन सिस्टिम प्रमाणे मिळणारी रक्कम (वर दाखवल्या प्रमाणे): 1140 कोटी रु 
c) नवीन सिस्टिम प्रमाणे मिळणारी जादा रक्कम: 1140 - 589 = 551 कोटी रु
d) एकूण शेतकऱ्यांना दिलेली जादा रक्कम:  288.8 कोटी रु
e) साखर कारखान्याला मिळणार निव्वळ जादा फायदा: 551 - 288.8= 262.2 कोटी रु

सरकारला जीएसटी बदलामुळे मिळणारी महसूल वाढ
साखरेचे सकल (Gross ) सन 2022-23 गाळप हंगाम : एकूण उत्पादन 390 लाख टन 
निर्यात अंदाजे: 35 लाख टन 
इथेनॉल साठी वर्ग केलेली साखर (Diverted for Ethanol) अंदाजे: 35 लाख टन
वापरण्यात येणारी उर्वरित साखर: 320 लाख टन
a) नवीन सिस्टिम प्रमाणे मिळणार महसूल:             
i) घरगुती वापर :  320 X 0.20 = 64 लाख टन
जीएसटी  (GST) @ 5% प्रमाणे :  64 X 0.05 X 40000/100= 1280 कोटी रु
ii) औद्योगिक वापर : 320 X 0.80 = 256 लाख टन
जीएसटी (GST) @ 18%  प्रमाणे : 256 X 0.18 X 65000/100= 29952 कोटी रु
iii) एकूण उत्पन्न: 1280 + 29952= 31232  कोटी रु

b)  जुन्या पद्धती प्रमाणे मिळणार महसूल : 320 X 31000 X 0.05 /100=  4960 कोटी रु          
जीएसटी (GST) @ 5%  प्रमाणे                                    
c) सरकारला जीएसटी मुळे मिळणारी महसूल वाढ:  31232 - 4960 = 26, 272 कोटी रु

थोडक्यात, होणारे फायदे खालील प्रमाणे
a) प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारा भाव :  4950.8 रू. प्रती टन  
b) शेतकऱ्यांना एकूण मिळणारी जादा रक्कम:  288.8 कोटी रु (एका कारखान्यासाठी) 
c) एका साखर कारखान्याला मिळणार एकूण जादा  फायदा: 262.2  कोटी रु  
d) सरकारला जीएसटी मुळे मिळणारी महसूल वाढ: 26, 272 कोटी रु. प्रति वर्षी 

नोंद (Notes )

1.  कारखान्याच्या गृहीत धरलेल्या कारखान्याची वर्षाची उत्पादीत साखर,  मेट्रिक टन मध्ये बदल झाला तरी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावामध्ये फरक पडत नाही. 

 2. वरील कॅलक्युलेशन मध्ये शेतकऱ्यांना द्वितीय प्रक्रिया उत्पादने जसे सहवीज निर्मिती, इथेनॉल, रेक्टिफाइड स्पिरिट, खांडसरी, मद्य  निर्मिती, रसायने वगैरे च्या मुलवृद्धी पासून मिळू शकणारा फायदा पकडलेला नाही. (तो मोठा वेगळा विषय आहे). 

 3. वरील दरा मध्ये 'ऊस तोड व वाहतूक वजावट' धरलेली नाही (अंदाजे 700-725 रु प्रति टन )

साखर कारखाने हे कृषी उद्योग आहेत. ते शेतकऱ्यांचे शत्रू नाहीत. खरे शत्रू इतर उद्योग आहेत जसे शीतपेय, कॕडबरी, मिठाई, मद्य, औषधे वगैरे बनवणारे आहेत, जे साखरेवर प्रक्रिया करून 400 टक्के  नफा कमावत आहेत.


- सतीश देशमुख,
B.E. (Mech), पुणे  
(लेखक ऊस प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: sugarcane will get upto 5000 rupees per ton rate, how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.