आकाश येवलेलागवड ते ऊस कारखान्यापर्यंत जाईपर्यंत दीड वर्ष मेहनत केली. उत्पादन खर्च ३० टक्क्यांनी वाढला. एकरी १५ ते २० टन उत्पन्न घटले, मोठा गाजावाजा करत गेल्या हंगामापेक्षा दोनशे रुपयांनी भाव वाढला, तरी ऊसशेती तोट्याचीच ठरत आहे. यामुळे उसाची लागवड का करायची? असा सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या साखर कारखान्यांचे ऊस गाळप जोरात सुरू आहे. ऊस गाळपाला गेल्यानंतर या वर्षी उत्पादनात घट आल्याचे समोर आले आहे. हमखास पैसा मिळवून देणारे पीक अशी ऊसशेतीची ओळख होती. शेतकरी एकरी ६० ते १०० टन उत्पादन घेत होते. रासायनिक खते, मजुरी, शेणखत यावर मोठा खर्च करावा लागत होता, मात्र, अलीकडील काळात ऊस लागवडीपासून तर कारखान्यापर्यंत ऊस जाण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला एकरी उत्पादनात घट झाली आहे.
ऊस या पिकावर विद्यापीठाने संशोधन केले आहे. अनेक सुधारित जाती जन्माला घातल्या आहेत. रासायनिक खतांच्या मात्रा शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने दिल्या जात आहेत. रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी ड्रीप करूनही उत्पादन का घटले? यावर संशोधन होणे आवश्यक आहे. आता ऊसशेतीला पर्याय म्हणून शेतकरी कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाला, चारा पिके याकडे वळला आहे. या पिकांनाही बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.
अधिक वाचा: सुरु हंगामासाठी ऊस लावताय; १०० टन उत्पादन देणारे कुठले आहेत वाण?
ऊस उत्पादन खर्चनांगरट: २५००रोटा : २२००सरी : १५००रान बांधणी : ८००ऊस बेणे : ७००० ते ८०००बेसल डोस : १० हजारअन्य रासायनिक खते : १० हजारखुरपणी : ५ हजारलागवड मजुरी : ७ हजारड्रायव्हर भत्ता : १०० प्रत्येक खेपअन्य : १० हजारएकूण : ५० ते ५५ हजार
उत्पन्न घटण्याची कारणे- वारंवार ऊस पीक घेणे.- पाण्याचा अतिवापर.- रासायनिक खतांचा अतिरेक.- शासनाचे साखर धोरण.- ऊसदराचा फटका.- शुद्ध बियाण्यांची कमतरता.- हवामानातील बदल.- चुकीची खत मात्रा.- वजन काट्यात फसवणूक.- हुमणी व अन्य कीड रोगांचा प्रादुर्भाव.
ऊस पिकावर एकरी ५० ते ५५ हजारांपर्यंत खर्च होतो. खर्चाच्या तुलनेत उसाला अत्यंत तुटपुंजा भाव मिळतो. उत्पादनात १५ ते २० टक्के घट झाल्याने शेतकरी भुसार पिकांकडे वळत आहे. - उत्तम वराळे, विशाल घाडगे, शेतकरी राहुरी