Lokmat Agro >शेतशिवार > उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच

उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच

Summer soybean planting is a loss for farmers | उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच

उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच

सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प्रमाणात होत गेली.

सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प्रमाणात होत गेली.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनचे २०१८-१९ पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्षे महाराष्ट्रात या पिकाखालील लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. शिवाय, अधिकाधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांत बिगर हंगामी लागवड विशेषतः उन्हाळी लागवड २०२२-२३ पर्यंत मोठ्या प्रमाणात होत गेली. मात्र मागील दोन वर्षांत फायद्यांपेक्षा या पिकापासून नुकसान अधिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची विविध कारणे आहेत.

मागील तीन वर्षात सोयाबीन पिकावर खोड माशी, पांढरी माशी, मावा या किडी तर पिवळा मोझॅक, सोयाबीन मोझॅक, चारकोल रॉट (मुळकुज) या रोगांचा अधिक प्रमाणात म्हणजे १०० टक्केपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला होता. पिवळा मोलॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होऊन याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो तर सोयाबीन मोझॅक हा रोग सोयाबीन मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होऊन याचा प्रसार मावा या किडीद्वारे होतो.

मात्र २०२३-२४ या वर्षात बिगर हंगामी सोयाबीन लागवड अत्यल्प असल्याने खोडमाशी, पांढरी माशी, मावा या किडीसाठी वर्षभर अन्न उपलब्ध न होऊन त्यांचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत झाली. त्यांचे प्रमाण नैसर्गिकरीत्या संतुलित झाले. परिणामी या घातक किडी आणि यलो मोझॅक, सोयाबीन मोझॅक या रोगांची समस्या काही भागात अपवाद वगळता दिसून आल्या नाहीत. त्यामुळे खरीप २०२३ या हंगामात सोयाबीनची उत्पादन पातळी चांगली राहिली. या सर्व कारणांचा विचार करता व मागील सलग तीन वर्षातील सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता बिगर हंगामी/उन्हाळी सोयाबीन लागवड करणे अयोग्य आहे हे सिद्ध झाले आहे.

सोयाबीन खरीप हंगामातील पीक
• सोयाबीन हे खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी विशिष्ठ प्रकारचे हवामान गरजेचे असते. पावसाळ्यातील थंड व आर्द्र हवामान या पिकास जास्त मानवते.
• सोयाबीन हे पीक सूर्य प्रकाशाचा कालावधी व तापमान यास अधिक संवेदनशील आहे. दिवसातील प्रखर सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी व अंधाराचा कालावधी जास्त असेल तर योग्य वेळेत फुलधारणा होते. मात्र उन्हाळ्यात याच्या विपरीत परिस्थिती असते त्यामुळे फुले कमी प्रमाणात लागतात व फुलधारणा होण्याचा कालावधी लांबतो.
• उन्हाळ्यात वातावरण उष्ण व कोरडे असते. हवेतील तापमान साधारणतः ३५०८ पेक्षा जास्त वाढल्यास फुलगळ अधिक प्रमाणात होते. शिवाय लागलेल्या शेंगा भरत नाहीत. बियाचा आकार व वजन यात मोठी घट येते.
• बिगर हंगामी सोयाबीन लागवडीमुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो परिणामी नुकसान जास्त होते.

डॉ. पी. जी. पाटील
कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Web Title: Summer soybean planting is a loss for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.