यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असले तरी विहीर व कॅनॉलला असलेल्या पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील ३० ते ४० गावांतील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाचे पीक घेतले. सद्य:स्थितीत वातावरण चांगले असल्यामुळे सूर्यफुल चांगले बहरले असून पुढे भाव योग्य मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
गतवर्षी सूर्यफुलाला ४५०० पर्यंत भाव होता. यावर्षी ४ हजार १५० एवढा भाव मिळत आहे. यापुढे अजूनही भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा, कौठा, बोराळा, किन्होळा, गिरगाव, बोरगाव, सोमठाणा, दाभडी, कोठारी, कानोसा, पार्टी ङबु आदी गावांतील शेत शिवारात इसापूर व सिद्धेश्वर या दोन धरणांचे पाणी मिळते.
दरवर्षी हिवाळा व उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळत असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी सूर्यफुलासारखे तीन महिन्यांचे हंगामी पीक घेऊन कुटुंबाचा गाडा चालवितात. यावर्षी नगदी पीक असलेल्या सोयाबीनला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून उसनवारी फेडण्यासाठी सूर्यफुलासारखी हंगामी पिके घेऊ लागला आहे. सूर्यफुलाला यावर्षी चांगला भाव मिळेल, असेही शेतकऱ्यांना वाटत आहे. दरम्यान, सध्या सूर्यफुल तेलाला चांगला भाव असल्याने सूर्यफुलालाही समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा आहे.
सध्या कुठे काय मिळतोय भाव?
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
12/03/2024 | ||||
धाराशिव | 1 | 3001 | 3001 | 3001 |
जळगाव | 350 | 3720 | 4000 | 3851 |
पुणे | 12 | 3500 | 4700 | 4700 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | ||||
11/03/2024 | ||||
जळगाव | 300 | 3775 | 4051 | 3921 |
जळगाव | 25 | 2700 | 4001 | 3911 |
नंदुरबार | 159 | 3800 | 5500 | 4450 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | ||||
09/03/2024 | ||||
बुलढाणा | 21 | 3580 | 3650 | 3615 |
जळगाव | 180 | 3875 | 3960 | 3900 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) |