Lokmat Agro >शेतशिवार > Svamitva Scheme: हद्दीवरुन होणारे वाद आता बाद; जाणून घ्या काय आहे कारण वाचा सविस्तर

Svamitva Scheme: हद्दीवरुन होणारे वाद आता बाद; जाणून घ्या काय आहे कारण वाचा सविस्तर

Svamitva Scheme: Boundary disputes are now over; Know what is the reason, read in detail | Svamitva Scheme: हद्दीवरुन होणारे वाद आता बाद; जाणून घ्या काय आहे कारण वाचा सविस्तर

Svamitva Scheme: हद्दीवरुन होणारे वाद आता बाद; जाणून घ्या काय आहे कारण वाचा सविस्तर

Svamitva Scheme : अमरावती जिल्ह्यात १३१७ गावांमध्ये 'ड्रोन फ्लाइंग' (Drone flying) झाल्याने गावठाणातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व भूमापन झाले व १०८९ गावात प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झालेले आहे. यासाठी 'स्वामित्व योजना' (Svamitva Scheme) मैलाचा दगड ठरली आहे.

Svamitva Scheme : अमरावती जिल्ह्यात १३१७ गावांमध्ये 'ड्रोन फ्लाइंग' (Drone flying) झाल्याने गावठाणातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व भूमापन झाले व १०८९ गावात प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झालेले आहे. यासाठी 'स्वामित्व योजना' (Svamitva Scheme) मैलाचा दगड ठरली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गजानन मोहोड

मिळकतींच्या हद्दीवरून होणारे वाद आता बाद झाले आहे. प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झाल्याने नागरिकांची पत वधारली व त्यांना बँकेचे कर्जदेखील मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यात १३१७ गावांमध्ये 'ड्रोन फ्लाइंग' (Drone flying) झाल्याने गावठाणातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व भूमापन झाले व १०८९ गावात प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झालेले आहे. यासाठी 'स्वामित्व योजना' (Svamitva Scheme) मैलाचा दगड ठरली आहे.

गावठाणातील मिळकतींवर सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ड्रोन फ्लाय  (Drone flying) करून नकाशा तयार करण्यात आला. शिवाय भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी तपासून नकाशे अंतिम करण्यासठी मोलाची भूमिका बजावली.

यानंतर प्रत्यक्ष चौकशी केली व अंतिम नकाशा व नोंदवही सर्व्हे ऑफ इंडियाला पाठविण्यात आली. याद्वारे तयार झालेल्या सनद आता १०८९ गावांमधील नागरिकांना मिळत आहे.

या कारणांनी तक्रारी

भूमापनाबाबत भूमापक यांनी खुणा दर्शविलेल्या नाहीत. मोजणी निशाणीप्रमाणे केलेली नाही, लगतधारकाचे अतिक्रमण असल्यास मला मोजणी मान्य नाही, भूमापकाने विरोधीधारकाशी संगनमताने मोजणी केली, भूमापकाला मोजणी करता येत नाही, यासह अन्य तक्रारी असतात.

अभिलेख्याचे स्कॅनिंग

* जुन्या अभिलेख्यांचे स्कॅनिंग या विभागाद्वारा करण्यात आले. यामध्ये पानांची संख्या ९,६१,७५७ आहे. यामध्ये ६५,९०७ मूळ फाइल आहे. यापैकी ६३,०७६ डिजिटल साइन करण्यात आलेल्या आहेत, तर २८३१ प्रलंबित आहेत.

* हे प्रमाण ९५.७० टक्के आहे. तर, जमीन एकत्रीकरण योजनेतील १३३ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

रोव्हर मशीनद्वारा भूमापनाची प्रक्रिया सुलभ व गतिशील झाली आहे. वर्षभरात विविध प्रकारातील ८,६६६ प्रकरणे निकाली निघाली. शिवाय फेरफार मोजणीचेही १८,९९९ प्रकरणे निकाली काढण्यात आले. - महेश शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख

वर्षभरात भूमापन मोजणी निकाली प्रकरणे

हद्द कायम५६३२
पोटहिस्सा२४५३
बिनशेती४४२
कोर्ट वाटप२६
कोर्ट कमिशन३५
भूसंपादन२९
शासकीय४९
फेरफार मोजणी१८९९८

हे ही वाचा सविस्तर : land surveying: भूमापन करण्याच्या पद्धतीत असे झाले बदल वाचा सविस्तर

Web Title: Svamitva Scheme: Boundary disputes are now over; Know what is the reason, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.