गजानन मोहोड
मिळकतींच्या हद्दीवरून होणारे वाद आता बाद झाले आहे. प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झाल्याने नागरिकांची पत वधारली व त्यांना बँकेचे कर्जदेखील मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात १३१७ गावांमध्ये 'ड्रोन फ्लाइंग' (Drone flying) झाल्याने गावठाणातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व भूमापन झाले व १०८९ गावात प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झालेले आहे. यासाठी 'स्वामित्व योजना' (Svamitva Scheme) मैलाचा दगड ठरली आहे.
गावठाणातील मिळकतींवर सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ड्रोन फ्लाय (Drone flying) करून नकाशा तयार करण्यात आला. शिवाय भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी तपासून नकाशे अंतिम करण्यासठी मोलाची भूमिका बजावली.
यानंतर प्रत्यक्ष चौकशी केली व अंतिम नकाशा व नोंदवही सर्व्हे ऑफ इंडियाला पाठविण्यात आली. याद्वारे तयार झालेल्या सनद आता १०८९ गावांमधील नागरिकांना मिळत आहे.
या कारणांनी तक्रारी
भूमापनाबाबत भूमापक यांनी खुणा दर्शविलेल्या नाहीत. मोजणी निशाणीप्रमाणे केलेली नाही, लगतधारकाचे अतिक्रमण असल्यास मला मोजणी मान्य नाही, भूमापकाने विरोधीधारकाशी संगनमताने मोजणी केली, भूमापकाला मोजणी करता येत नाही, यासह अन्य तक्रारी असतात.
अभिलेख्याचे स्कॅनिंग
* जुन्या अभिलेख्यांचे स्कॅनिंग या विभागाद्वारा करण्यात आले. यामध्ये पानांची संख्या ९,६१,७५७ आहे. यामध्ये ६५,९०७ मूळ फाइल आहे. यापैकी ६३,०७६ डिजिटल साइन करण्यात आलेल्या आहेत, तर २८३१ प्रलंबित आहेत.
* हे प्रमाण ९५.७० टक्के आहे. तर, जमीन एकत्रीकरण योजनेतील १३३ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले.
रोव्हर मशीनद्वारा भूमापनाची प्रक्रिया सुलभ व गतिशील झाली आहे. वर्षभरात विविध प्रकारातील ८,६६६ प्रकरणे निकाली निघाली. शिवाय फेरफार मोजणीचेही १८,९९९ प्रकरणे निकाली काढण्यात आले. - महेश शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख
वर्षभरात भूमापन मोजणी निकाली प्रकरणे
हद्द कायम | ५६३२ |
पोटहिस्सा | २४५३ |
बिनशेती | ४४२ |
कोर्ट वाटप | २६ |
कोर्ट कमिशन | ३५ |
भूसंपादन | २९ |
शासकीय | ४९ |
फेरफार मोजणी | १८९९८ |
हे ही वाचा सविस्तर : land surveying: भूमापन करण्याच्या पद्धतीत असे झाले बदल वाचा सविस्तर