Lokmat Agro >शेतशिवार > Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख

Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख

Swadhar Yojana 2024 : Children of farmers will also get benefit of 'Swadhar' scheme; This is the last date | Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख

Swadhar Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या मुलांनाही 'स्वाधार' योजनेचा मिळणार लाभ ; ही आहे शेवटची तारिख

'स्वाधार'च्या अर्ज नूतनीकरणासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मिळाली मुदत मिळाली आहे. या योजनेची माहिती वाचा सविस्तर (Swadhar Yojana 2024)

'स्वाधार'च्या अर्ज नूतनीकरणासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मिळाली मुदत मिळाली आहे. या योजनेची माहिती वाचा सविस्तर (Swadhar Yojana 2024)

शेअर :

Join us
Join usNext

Swadhar Yojana 2024 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदत मिळाली आहे.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाजकल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी २०२४-२५ या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात.

त्यासाठी पोर्टलवर एक्झिस्टींग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत करावा.

तसेच ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात जमा करावी, असे आवाहन हिंगोली येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

येथे करावा लागणार अर्ज

■ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे २०२४-२५ मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज  https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.

■ नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता ११ वी, प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे.

असा मिळेल लाभ

* स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना उमेदवाराला समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल तसेच ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

* स्वाधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव-बौद्ध समाजातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

* स्वाधार योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये दिले जातील.

Web Title: Swadhar Yojana 2024 : Children of farmers will also get benefit of 'Swadhar' scheme; This is the last date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.