Join us

swamitva yojana : स्वामित्व योजनेतून ५००० गावांत ड्रोनचे उड्डाण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 13:23 IST

स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करून गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-Property Card) मिळणार आहे.

गजानन मोहोड

अमरावती : स्वामित्व योजनेंतर्गत (Swamitva Yojana) देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करून गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-Property Card) मिळणार आहे.

प्रत्येक घराला मालमत्ता पत्रक देण्यासाठी पश्चिम विदर्भ विभागातील ५ हजार ३०९ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आले आहे. यामध्ये सात लाख घरांची चौकशी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली, तर ३ हजार ८६० गावांमधील मालमत्तांची सनद सध्या तयार झालेली आहे.

सर्व काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे भूमिअभिलेख विभागाचे नियोजन आहे. ग्रामविकास विभाग, भूमिअभिलेख कार्यालय व सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे स्वामित्व योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

योजनेंतर्गत अमरावती विभागात ५ हजार ४०५ गावठाणांमधील (Village Areas) ५ हजार ३०९ गावांमधील भूमापन करण्यात आल्याने मिळकत पत्रिका (पीआर कार्ड) तयार झाल्या व या घरमालकांना आता विविध लाभ घेता येणार आहे.

ड्रोनच्या साहाय्याने मालमत्तांचे जीएसआय (GSI) मॅपिंग करण्यात आलेले आहे. सर्व्हे ऑफ इंडियाद्वारा प्राप्त नकाशाची पडताळणी भूमिअभिलेख विभागाद्वारे करण्यात आली व स्वामित्व योजनेच्या एमएसआयएस (MSIS) पोर्टलवर डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. त्या आधारे मिळकर्तीचे जीआयएस मॅपिंग (Mapping) करण्यात आले.

प्रत्येक मिळकतीचे नकाशे तयार झाल्यानंतर सनद व मिळकत पत्रिका तयार झालेली असल्याची माहिती अमरावतीचे अधीक्षक, भूमिअभिलेख महेश शिंदे यांनी दिली.

पोर्टलवर मिळकत धारकांची संख्या

वाशिम७४,४६७
अकोला१,५३,११२
यवतमाळ१,५७,६९३
अमरावती१,९९,८७८८
बुलढाणा२,३९,६९४
एकूण८,२४,८४४

स्वामित्व योजनेचे फायदे

* मालमत्ताधारकांना पूर्वी मिळकतीचा नकाशा उपलब्ध नव्हता, तो आता तयार झाला. ड्रोन तंत्रज्ञान व प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला आहे. शिवाय पीआर कार्ड तयार झाल्याने मालमत्तेचा पुरावा उपलब्ध झाला.

* शिवाय मालकीच्या हक्कावरून भांडण-तंटे व्हायचे ते आता होणार नाहीत. ग्रामपंचायतींचा महसूल वाढेल, शिवाय गावाच्या विकासासाठी नियोजन करताना नकाशे उपयोगी पडणार आहेत.

मालमत्तेचा मिळेल डिजिटल नकाशा

नंदुरबार : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार, संबंधित मालकाला, शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील २९ गावांना राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ७८ गावातील नागरिकांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली.

स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळकतींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात आलेले आहे. याद्वारे विभागात ५,३०९ गावांची क्षेत्रीय कामे पूर्ण झालेली आहेत. - डॉ. लालसिंग मिसाळ, उपसंचालक, भूमिअभिलेख

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवणार; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारी योजनासरकारकेंद्र सरकार