Lokmat Agro >शेतशिवार > Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल

Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल

Sweet Potato farming : Longgaon has become a hotbed for sweet potato crop; This year 90 percent of farmers are inclined towards cultivation | Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल

Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल

राजूर येथील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली आहे. (Sweet Potato farming)

राजूर येथील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली आहे. (Sweet Potato farming)

शेअर :

Join us
Join usNext

Sweet Potato farming :

श्याम पुंगळे

राजूर येथील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी २ ते ४ एकरपर्यंत, तर अल्पभूधारक किमान १० ते २० गुंठ्यांत रताळ्याची शेती करतात.

यंदा १० टक्के शेतकऱ्यांनी रताळी लागवडीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे आता लोणगाव हे रताळ्याचे आगार बनले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. लोणगाव येथील शेतकऱ्यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठी मागणी असते. या शेतकऱ्यांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात रताळ्यांची लागवड केली आहे. महाशिवरात्रीला बाजारात रताळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातून लाखोंची उलाढाल होते.

मागील वर्षीपेक्षा यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी रताळे लागवडीवर अधिक भर दिल्याचे दिसून आले. लोणगाव येथील शेतकरी साधारणतः जुलै महिन्यात रताळ्याची लागवड करतात.

व्यापारी खरेदीसाठी थेट बांधावर येतात

महाशिवरात्री जवळ येताच अनेक व्यापारी रताळ्याची खरेदी करतात. काही शेतकरी स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ पद्धतीने विक्री करतात. बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना ठोक भावात रताळ्याची विक्री करतात. ही रताळी खरेदीसाठी जालना, अहमदनगर, केज, धारूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापारी थेट बांधावर येतात. - सोमीनाथ फुके, शेतकरी, उंबरखेडा

यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता

दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही रताळाची लागवड केली आहे. यावेळी दोन एकरात शंभर ते दीडशे क्विंटल रताळाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पाऊस समाधानकारक असल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. - नरफससिंह शेखावत, शेतकरी, लोणगाव

Web Title: Sweet Potato farming : Longgaon has become a hotbed for sweet potato crop; This year 90 percent of farmers are inclined towards cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.