मुलांमध्ये खिलाडूवृत्ती आणि निरोगी जीवनशैली या गोष्टी वाढीस लागाव्या या हेतूने नाशिकच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील कृषी व्यवस्थापन ( ऍग्री - ऑपरेशन्स) च्या विद्यार्थ्यांसह विविध विभागांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन लक्ष्य २०२३' अंतर्गत करण्यात आले होते.
७ ते ९ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या क्रीडा कार्यक्रमात फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बँडमिंटन पासून ते कॅरम, बुद्धिबळ असे सामने झालेत. दरम्यान क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संचालिका, डॉ. वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बिशाल डे सरकार, लक्ष्य विद्यार्थी समिती आणि कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
संस्थेतर्फे ऍग्री - ऑपरेशन्स (AOM) मॅनेजमेंट हा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु असून येथे कृषी उद्योग तथा तद्सदृश्य व्यवसाय ,शेतकरी ,शेतकरी उद्योजक ,कृषी व्यापार आणि व्यवस्थापन अशा क्षेत्रातले ऑपरेशन्स आणि तत्सम व्यवस्थापकीय विषयांवर उच्च शिक्षित, अनुभवी दिगज्जांचे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतीविषयक उद्योग व्यवसायाबद्दल आणि तेथील समस्यांबद्दल विद्यार्थी जागरूक होतात व शेती व्यवसायात प्रत्यक्ष कामही करतात.