डाळिंबावरचे जिवाणुजन्य करपा प्रथम १९५२ मध्ये दिल्लीमधुन भारतात पसरले. सध्या हा रोग मोठया प्रमाणावर होते आणि महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या प्रमुख डाळिंब वाढवणाऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे. डाळिंब हे एक प्रमुख कोरडवाहू फळपिक असून हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर घेता येणारे एक महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक महत्वाचे नगदी पीक बनलेले आहे. या रोगाला 'तेलकट डाग असे पण म्हणतात. हा रोग झन्थामोनास ऑक्झीनोपोडिस पीव्ही पुनिकी या जिवाणूंमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर आढळुन येते. संसर्ग झालेली फळे आणि खोड हे प्राथमिक प्रसाराचे संभाव्य स्त्रोत आहेत. या जिवाणूंचा दुय्यम प्रसार पाऊस, सिंचन पाणि, रोपांची छाणी साधने, मानव आणि किटक (vector) माध्यमांतून प्रामुख्याने होतो.
या रोगाचा प्रवेश जखमा आणि नैसर्गिक संपर्काशी संबंधामुळे होतात. २-३ दिवसात हा रोग पाणीदार व कालांतराने काळपट होऊन डागांभोवती पिवळी वलये दिसतात. हे डाग उन्हात बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठे झाल्यावर पाने पिवळे पडुन वाळतात. जून ते सप्टेंबर दरम्यान हा रोग जलद तयार होतो. या रोगाचा प्रसार ढगाळ हवामान, अधून मधुन पाऊस किंवा अति पाऊसामुळे आढळून येतात. जून व जुलै दरम्यान या रोगाची तीव्रता अधिक वाढते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त पसरते व त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. जीवाणू पेशी १२० दिवसांपेक्षा जास्त मातीमध्ये आणि गळालेल्या पाणांमध्ये जगण्यास सक्षम राहतात. उच्च तापमान आणि कमी आद्रता किंवा दोन्ही रोगाच्या विकासास मदत करतात. जीवाणू वाढीसाठी किमान तापमान ३० सेल्सिअस कमाल मृत्युबिंदू ५२ सेल्सिअस एवढे असते.
लक्षणे
- सुरुवातीला हा रोग काळा ठिबका, गोल आणि जिवाणूजन्य द्रव्यांनी व्यापलेला असतो.
- लहान लालसर तपकिरी गोल डाग फळांवर दिसन येतील.
- काही कालांतराने हे डाग संगठीत होऊन मोठ्या डागात रुपांतर होते व फळे खराब होण्यास सुरुवात होते.
- प्रभावित फळे फिकट गुलाबी रंगाची होतात, जे खाण्यास खराब (अयोग्य) ठरतात.
- अनुकुल परिस्थितीत, हे डाग गदड तपकिरी रंगाचे मोठे व ठळक होतात. त्यानंतर ही प्रार्दुभावित फळे तडकतात.
- या रोगामुळे डाळिंबाचे उत्पन्न कपात किमान ९० टक्के पर्यंत होऊ शकते.
- फळांना या डागांमुळे इंग्रजी L किव्हा Y अक्षरासारखे आडवे उभे तडे जातात. फळांची प्रत पुर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे गळुन पडतात.
- फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात. यामुळे फुले व कळ्यांची गळ होते.
रोगाचा प्रसार
- रोपे जर रोगट मात्रुवृक्षापासुन बनवलेली असतील तर रोगाचा नवीन प्रदेशात प्रार्दुभाव होतो.
- बागेतील झाडांमध्ये कमी अंतर असल्यास रोगट व निरोगी झाडांच्या फांदया एकमेकांत मिसळतात. त्यामुळे रोगाची लागण होते.
- बागेत वाहणारे पाणी, पाऊस व वारे याद्वारे सुद्धा रोगाचा प्रसार होतो.
- रोगाची लागण झालेल्या पृष्ठभागावर, पावसाचे मोठे थेंब पडले असता त्याद्वारे उडणाऱ्या तुषारामध्ये जिवाणू मिसळुन बागेत पसरतात.
- बागेत वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा रोगट झाडांवर वापर केल्यानंतर निजंतुक न करता निरोगी झाडांवर वापरल्यास रोगाचा प्रसार होतो.
- या रोगाचा प्रसार बागेत माणसाद्वारे तोड्णी, झाटणी, फवारणी अशा विविध कामांद्वारे सुद्धा होऊ शकतो.
- या रोगप्रसारास पाने पोखरणारी अळी, फुलपाखरे, माश्या हे सुद्धा सहाय्यक घटक ठरतात.
व्यवस्थापन
पारंपारिक पध्दती
- सर्व प्रभावित फळे गोळा करुन नष्ट करणे.
- रोपांची छाटणी करण्यापुर्वी बोर्डो मिश्रण लावणे.
- गळलेली पाने आणि खोडांनाची विल्हेवाट लावणे.
- तेलकट डाग असलेली फळे काढुन त्यांना जाळणे आवश्यक आहे.
रासायनिक पध्दती
- मॅन्कोझेब (०.२५) किंवा कॅपटॅफ (०.२५) ची फवारणी प्रभाविपणे रोगाला नियंत्रित करते.
- तेल्या रोगावर एक विशिष्ट रोगजंतुचा नाश करणारा सुक्ष्म जीव विकसित केले गेले आहे.
- डाळींबावरील जिवाणू करपा आता यशस्विरित्या 'तेलबा' वापरुन हाताळू जाऊ शकते. 'तेलबा' हा विशिष्ट सुक्ष्म रोगजंतुचा नाश करणारा म्हणजे अॅन्थामोनास ऑक्ज़िनापोडिस पीव्ही या रोगास नष्ट करते.
- ३-४ दिवसात रोग निर्मुलन करण्यासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम फवारणी कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम/लिटर मध्ये मिश्रण करुन सतत ३ दिवसात फवारणी करा. ३ दिवसात तेलकट डागांची वाढ थांबते आणि जिवाणु पुर्णपणे ठार होतात.
डॉ. निशा एम. पाटील
सहाय्यक प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र
छ.शा.म.शि. संस्था, कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छ. संभाजीनगर