Join us

वाढत्या थंडीपासून घ्या पशुधनाची काळजी

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 04, 2023 3:00 PM

जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन..

राज्यात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जनावरांच्या वाढीसाठी पोषक असणाऱ्या या वातावरणात पहाटेच्या थंड वाऱ्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. येत्या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये कमी पावसामुळे पशुधनासाठी चारा टंचाई भासू लागली आहे. अनेक भागात मक्यापासून मुरघास तसेच चारा पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करणे हे शेतकरी व पशुपालकांसमोरील मोठा प्रश्न आहे.

दुधाळ जनावरांची हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी?

दरम्यान, वाढत्या थंडीपासून दुभत्या जनावरांचे तसेच पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्राने पशुसल्लाही दिला आहे.

पशुसाठी चारा व्यवस्थापन 

- मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन करावे

- रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे आवश्यक आहे.

- इतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे.इत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीहवामान