Lokmat Agro >शेतशिवार > Tar Kumpan Yojana : पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त 'तार कुंपण योजना' वाचा सविस्तर माहिती

Tar Kumpan Yojana : पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त 'तार कुंपण योजना' वाचा सविस्तर माहिती

Tar Kumpan Yojana : Read detailed information about 'Tar Kumpan Yojana' useful for protecting crops | Tar Kumpan Yojana : पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त 'तार कुंपण योजना' वाचा सविस्तर माहिती

Tar Kumpan Yojana : पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त 'तार कुंपण योजना' वाचा सविस्तर माहिती

Tar Kumpan Yojana : शेतात वन्यप्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'तार कुंपन अनुदान योजना' (Tar Kumpan Yojana) सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाऊस, दुष्काळसदृश्य परिस्थिती, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

हे टाळण्यासाठी राज्य सरकारने 'तार कुंपण योजना' सुरू केली आहे. या  योजनेअंतर्गत सरकार ९०% अनुदानावर काटेरी तार कुंपण उभारण्यासाठी मदत करत आहे. तार कुंपण योजनेअंतर्गत २ क्विंटल काटेरी सोबतच ३० खांब उभारण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. 

शेतकऱ्यांना उर्वरित १० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वत: भरावी लागणार आहे. तार कुंपण हे वन्य प्राणी जसे हत्ती, डुक्कर, हरिण, नीलगाय आदींमुळे पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त

शेतीमधील पीक सुरक्षित राहावे आणि वन्यजीवांमुळे पिकांची होणारी हानी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने काटेरी तार कुंपणासाठी आर्थिक मदतीची योजनेस प्रारंभ केला आहे. या उपक्रमामुळे पिकांवर होणारा परिणाम कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

काय आहे योजनेच्या अटी

* शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असू नये.

* वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात येणाऱ्या जमिनींना ही सुविधा मिळणार नाही.

* ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून संमती पत्र अनिवार्य आहे.

* योजनेतील पात्र शेतकऱ्यांना २ क्विंटल काटेरी तार आणि ३० लोखंडी खांब उभारणी करण्यासाठी अनुदान मिळते.

येथे करा अर्ज

शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  

आवश्यक कागदपत्रे

* सातबारा उतारा आणि गाव नमुना ८

* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

* शेतकऱ्याचे आधार कार्ड

* शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास इतर मालकांचे संमती पत्र

* ग्रामपंचायतीचा अधिकृत दाखला

* वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

हे ही वाचा सविस्तर : Halad BajarBhav : संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची दररोज किती आवक; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Tar Kumpan Yojana : Read detailed information about 'Tar Kumpan Yojana' useful for protecting crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.