Join us

आम्ही कांदा पिकवायचा की नाही, ते तरी एकदा सांगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 1:52 PM

कांद्याचा हा लिलाव आम्हाला मान्य नाही. कुठल्याही शेतकऱ्याचा खर्चच सुटू नाही राहिला. ही परिस्थिती सुधारणार कोण? ६०० ते ८०० रुपये असा कांदा बाजारभाव चालू आहे, साहेब. आमचा बियाण्यांचा, लागण्यांचा आणि खताचा खर्चही नाही सुटू राहिला, मग ते कांदे विकायचे कशासाठी? शेतकऱ्यांनी कांदा पिकवायचा की नाही?

कांद्याचा हा लिलाव आम्हाला मान्य नाही. कुठल्याही शेतकऱ्याचा खर्चच सुटू नाही राहिला. ही परिस्थिती सुधारणार कोण? ६०० ते ८०० रुपये असा भाव चालू आहे, साहेब. आमचा बियाण्यांचा, लागण्यांचा आणि खताचा खर्चही नाही सुटू राहिला, मग ते कांदे विकायचे कशासाठी? शेतकऱ्यांनी कांदा पिकवायचा की नाही? नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावावेळी एक शेतकरी पोटतिडकीने, घसा कोरडा होईपर्यंत त्याची व्यथा मांडत होता. महाराष्ट्रभर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रातिनिधिक प्रतिक्रियाच नव्हे तर संताप आहे.

८ डिसेंबरपासून कांदा निर्यातबंदी लादल्यानंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव घसरत आहेत, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव क्विंटलला ३ हजार रुपयांवर गेले होते. यंदा खरिपाचे पीक उशिरा आल्यामुळे आता आवक वाढत आहे. मात्र, सरकारने वाट न पाहता, मिळालेल्या अहवालावर विश्वास ठेवत ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी लादली. केंद्रीय समितीने केलेली पाहणी सर्वंकष नसून त्यांनी अपेक्षित उत्पादनाची चुकीची माहिती सादर केली, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

कांद्याची लागवड आणि अपेक्षित उत्पादन याचा अचूक अंदाज घेणारी यंत्रणा अजूनही केंद्र सरकारकडे नाही. शेतमालाचे उत्पादन समजून घेणे हे 'रॉकेट सायन्स' नसल्याचे म्हटले जाते. मात्र, त्याची अचूक आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने कधी कांद्यावर निर्यातशुल्क लागू केले जाते, तर कधी थेट निर्यातबंदीची कुन्हाड चालविली जाते.

आठ दिवसांत क्विंटलमागे १,५९५ रुपये भाव पडलेकांदा निर्यातबंदी लादल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर पडले. अधिसूचनेनंतर आठ दिवसांत तीन हजार रुपये क्विंटलवर असलेल्या कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. क्विंटलमागे सरासरी १,५९५ रुपयांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

नाशिकमध्ये बंपर आवकनाशिक जिल्ह्यात डिसेंबरपासून कांद्याची आवक वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील मुख्य १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज साधारणपणे दीड लाख क्विंटल कांदा आवक होत आहे. महिनाभरापूर्वी आवक निम्मीसुद्धा नव्हती.

सोलापूरमध्ये विक्रमी आवकसोलापूर बाजार समितीत तर काही दिवसांपासून रोज एक लाख क्विंटल इतकी विक्रमी आवक होत आहे. कांदा उतरून घेण्यासाठीही आवारात जागा नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कांद्याचे रोजच्या रोज लिलाव करणेही अवघड झाले आहे.

योगेश बिडवई मुख्य उपसंपादक

टॅग्स :कांदाबाजारशेतकरीपीकमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकेंद्र सरकारसरकारसोलापूरनाशिक