Lokmat Agro >शेतशिवार > हजार रुपये किलो थायलंडचं राष्ट्रीय फळ आले सोलापुरात.. वाचा सविस्तर

हजार रुपये किलो थायलंडचं राष्ट्रीय फळ आले सोलापुरात.. वाचा सविस्तर

Thailand's national fruit of 1000 rupees per kg has arrived in Solapur.. read in detail | हजार रुपये किलो थायलंडचं राष्ट्रीय फळ आले सोलापुरात.. वाचा सविस्तर

हजार रुपये किलो थायलंडचं राष्ट्रीय फळ आले सोलापुरात.. वाचा सविस्तर

फळांचा राजा हा आंबा आहे सगळ्यांना माहीत असतं. पण, फळांची राणी कोणती याचा फारसा कुणी विचार करत नाही. मॅगोस्टीन फळाला फळांची राणी म्हटलं जातं.

फळांचा राजा हा आंबा आहे सगळ्यांना माहीत असतं. पण, फळांची राणी कोणती याचा फारसा कुणी विचार करत नाही. मॅगोस्टीन फळाला फळांची राणी म्हटलं जातं.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : फळांचा राजा हा आंबा आहे सगळ्यांना माहीत असतं. पण, फळांची राणी कोणती याचा फारसा कुणी विचार करत नाही. मॅगोस्टीन फळाला फळांची राणी म्हटलं जातं.

हे फळ शहरातील लक्ष्मी मार्केट बाजारपेठ येथे दाखल झाले असून, आठशे ते हजार रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. हे फळ प्रामुख्याने थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळतं. इथेच याचं जास्त उत्पादन घेतलं जातं.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मँगोस्टीन हे फळं थायलंडचं राष्ट्रीय फळ आहे. हे प्रामुख्याने निलगिरी टेकड्या, कन्याकुमारी आणि केरळसारख्या भारताच्या दक्षिणेकडील भागात घेतले जाते.

त्वचा जांभळ्या-मरून रंगाची असून, तिचा आतील भाग मांसल आहे, जो पांढरा आहे. हे थायलंडचे राष्ट्रीय फळ असले तरी दक्षिण भारतात १८व्या शतकापासून त्याची लागवड केली जात आहे.

फळांची राणी आणि देवांचे अन्न, मँगोस्टीन हे थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरसारख्या दक्षिण-पूर्व आशियातील विविध भागांमध्ये उगवले जाणारे गोड आणि तिखट फळ आहे. ज्याचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत.

मँगोस्टीनमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स असतात आणि याने कॅन्सर व हृदयरोगापासून बचाव होतो. असं म्हटलं जातं की, सर्दी-खोकला झाल्यावर हे फळं खाल्लं तर खूप फायदा मिळतो.

थायलंडचे राष्ट्रीय फळ
जांभळ्या रंगाच्या फळाला पांढरा मांसल लगदा असतो, ज्यामध्ये बिया असतात. या फळाचे शास्त्रीय नाव गार्सिनिया मँगोस्ताना असले तरी भारतासारख्या विविध देशात है फळ लोकप्रिय आहे.

विविध पोषक तत्त्व
-
१ कप मँगोस्टीनमध्ये १४ टक्के फायबर असते. याशिवाय व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त त्यात लोह पोटॅशियम आणि कॅल्शियमदेखील असते.
- त्यात थायामिन, नियासिन आणि फोलेट्ससारखी बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वेदेखील असतात.
- कॅलरी कमी असण्याबरोबरच मँगोस्टीनमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरदेखील भरपूर असतात.
- हे उष्णकटिबंधीय फळ असून ते गोड आणि आंबट आहे.
- ज्याप्रमाणे आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते, त्याचप्रमाणे मँगोस्टीनला फळांची राणी देखील म्हटले जाते.
- त्याचा रंग जांभळा आहे.

Web Title: Thailand's national fruit of 1000 rupees per kg has arrived in Solapur.. read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.