शेतकऱ्यांना लाभ देणारे महत्वाचे पाऊल म्हणून पंतप्रधान १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) राष्ट्राला समर्पित करतील. शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी एकाच जागी उपाययोजना देण्यासाठी ही केंद्रे विकसित केली जात आहेत. कृषी संबंधित साधने/उपकरणे (खते, बियाणे, अवजारे) यांच्या माहितीपासून ते माती, बियाणे आणि खतांच्या चाचणी सुविधांपर्यंत, विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करुन देत, पीएम किसान समृद्धी केंद्रे ही देशातील शेतकर्यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय, तालुका/जिल्हा स्तरावरील केंद्रांवर किरकोळ खत विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढ सुनिश्चित करतील.
पंतप्रधान युरिया गोल्ड या युरिया खताच्या वेगळ्या प्रकाराचा, ज्यावर सल्फरचा लेप आहे अशा उत्पादनाचेही उद्घाटन करतील. सल्फरयुक्त युरिया, जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करेल. हे नाविन्यपूर्ण खत कडूनिंबाचे आवरण असलेल्या युरियापेक्षा अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम आहे, त्यामुळे वनस्पतींमध्ये नायट्रोजन वापराची कार्यक्षमता सुधारते, खताचा वापर कमी करावा लागतो आणि पिकाची गुणवत्ताही वाढवते.
या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते १५०० शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ओ एन डी सी) वर लाँच करण्यात येईल. ओ एन डी सी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल विपणन, ऑनलाईन देयके, व्यवसाय ते व्यवसाय (B2B) आणि व्यवसाय ते ग्राहक व्यवहार करता येतील आणि त्यामुळे स्थानिक मूल्यवर्धनासह ग्रामीण भागातील दळणवळणाच्या वाढीला चालना मिळेल.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत १४ व्या हप्त्याची रक्कम ८.५ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना १७,००० कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जारी केले जातील.