Join us

या राज्याचा कृषी पॅटर्न येईल संपूर्ण देशात; केंद्रीय कृषीमंत्री पद गेले या राज्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:08 PM

केंद्रीय मंत्री मंडळ विस्तार जाहीर ..

विविध राज्यातील अनपेक्षित निकालानंतर मोदी 3.0 मध्ये नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

यात आज सोमवार (दि.१०) जून रोजी मंत्रालयाचे विभाजन ही सुरू झाले आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. तर चिराग पासवान यांना क्रीडा, अन्न व प्रक्रिया मंत्रालय देण्यात आले आहे. 

लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशच्या विदिशामधून सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले शिवराज सिंह चौहान हे राज्यातील भाजपचे जुने आणि मोठे नेते आहेत. तसेच सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

 

शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय दिले जाऊ शकते, अशी अटकळ आधीच वर्तवली जात होती. कारण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मध्य प्रदेशला अनेकवेळा कृषी उन्नती पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच शिवराज सिंह चौहान यांना पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयही देण्यात आले आहे. 

नव्या मंत्रिमंडळात कोणाला काय मिळाले?

  • राजनाथ सिंह - संरक्षण खाते 
  • अमित शहा - गृह, सरकार 
  • नितिन गडकरी - रस्ते वाहतूक व महामार्ग 
  • जगतप्रकाश नड्डा - आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायने, खते
  • शिवराजसिंह चौहान - कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास
  • निर्मला सीतारामन - अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार
  • डॉ. एस. जयशंकर - परराष्ट्र व्यवहार 
  • मनोहरलाल खट्टर - गृहनिर्माण, शहरविकास, ऊर्जा 
  • एच. डी. कुमारस्वामी - अवजड उद्योग, पोलाद 
  • पीयूष गोयल - वाणिज्य, उद्योग 
  • धर्मेंद्र प्रधान - शिक्षण 
  • जीतनराम मांझी - सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खाते 
  • राजीवरंजन सिंह - पंचायती राज, मत्स्यपालन,  पशुसंवर्धन, दुग्धविकास
  • सर्बानंद सोनावाल - बंदरे, जलमार्ग, जहाज उद्योग
  • डॉ. विरेंद्रकुमार - सामाजिक न्याय, सबलीकरण
  • के. आर. नायडू - नागरी हवाई वाहतूक 
  • प्रल्हाद जोशी - ग्राहकविषयक बाबी, अन्न, सार्वजनिक वितरण, नवी आणि अक्षय ऊर्जा खाते
  • ज्यूएल ओराम - आदिवासी विकास खाते 
  • गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग 
  • अश्विनी वैष्णव - रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान
  • ज्योतिरादित्य सिंधिया - दूरसंचार, ईशान्य भारत विकास
  • भुपेंद्र यादव - पर्यावरण, वने, हवामान बदल
  • गजेंद्रसिंह शेखावत - सांस्कृतिक, पर्यटन 
  • अन्नपूर्ण देवी - महिला व बालकल्याण
  • किरेन रिजिजू - संसदीय कामकाज, अल्पसंख्याकविषयक बाबी
  • हरदीपसिंग पुरी - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू
  • डॉ. मनसुख मांडवीय - कामगार, रोजगार, युवाविषयक घडामोडी व क्रीडा
  • जी. किशन रेड्डी - कोळसा, खाणी
  • चिराग पासवान - अन्नप्रक्रिया उद्योग
  • सी. आर. पाटील - जलशक्ती खाते 

हेही वाचा - Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा

टॅग्स :नरेंद्र मोदीमंत्रीलोकसभाभाजपासंसददिल्लीशेती क्षेत्रशिवराज सिंह चौहानमध्य प्रदेश