कोल्हापूर : गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खरिपाच्या अन्नधान्य कडधान्याच्या व बेभरवशाच्या दरामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे.
त्या तुलनेत उसाला चांगला भाव मिळू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरने कमी झाले, तर उसाचे क्षेत्र तब्बल १६ हजार हेक्टरने वाढले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र हे ७ लाख ७६ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ५ लाख ७ हजार हेक्टर हे लागवडीलायक आहे. निव्वळ पेरा क्षेत्र ४ लाख ७७ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, नागली, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. खरिपात सर्वाधिक भात पीक हे ९२ हजार हेक्टरवर घेतले जाते.
त्यापाठोपाठ सोयाबीन, भुईमूग या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरणीमुळे भुईमुगालाही अपेक्षित दर मिळाला नाही. त्या तुलनेत उसाला बऱ्यापैकी तेही एकरकमी दर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे.
अक्षय तृतीया झाल्याने खरीप तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यात वळीव पाऊस जोरदार कोसळत असल्याने मशागतीला मदत होत आहे.
घरी खाण्यापुरता भात पिकविण्याकडे कलभाताचा उत्पादन खर्च आणि काढणीनंतर बाजारातील दर पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे अलीकडील चार-पाच वर्षांत घरी खाण्यापुरताच भात पिकविण्याकडे बहुतांशी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पीक क्षेत्रातील तफावत
पीक | २०२२-२३ (हे.) | २०२३-२४ (हे.) |
खरीप | १.९६ लाख | १.९२ लाख |
रब्बी | २२,०७० | २१,००७ |
ऊस | १.७२ लाख | १.८८ लाख |
पेरणी अशी करायंदा मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन करावे. मध्यम खोल प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी पाऊस सुरु झाल्यानंतर सोयाबीन, भुईमुगाची खोलवर पेरणी करावी.
अधिक वाचा: Maize Ethanol इथेनॉलसाठी लागणारा मका भारतातच पिकविला तर मक्याला येतील सोन्याचे दिवस