Join us

रिफाइंड तेलातील रसायने आरोग्यास हानीकारक, मग आपल्या पारंपरिक तेलबीयांच्या तेलाचा पर्याय काय वाईट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:17 AM

पारंपरिक तेलबियांपासून तयार केलेले शुद्ध तेल आराेग्यवर्धक

सुनील चरपे

प्रत्येक रिफाइंड खाद्यतेलात किमान ६० टक्के पामतेल व ६ ते १६ प्रकारची विविध रसायने मिसळली जातात. त्यामुळे काेणतेही रिफाइंड तेल खाणे मानवी आराेग्यास हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. मग, आपण खायचे तरी काेणते तेल, असा प्रश्न उपस्थित हाेताे. याला पर्याय म्हणून आपल्या देशातील पारंपरिक तेलबियांपासून तयार केलेले शुद्ध तेल प्रमाणात खाणे आराेग्यवर्धक ठरते.

भारतातील पारंपरिक तेलबियांमध्ये मोहरी, भुईमूग, तीळ, जवस, करडई/करडी व कारळे यांचा समावेश हाेताे. सूर्यफूल तेलबिया असून, साेयाबीनचा समावेश तेलबिया हाेत नाही. ही दाेन्ही पिके भारतात परदेशातून आली आहेत. तेलबियांमध्ये समावेश नसलेल्या खाेबरेल तेलाचाही खाण्यासाठी वापर केला जाताे.

पंजाब, हरयाणासह संपूर्ण उत्तर भारतात माेहरी, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागांत भुईमूग व तीळ, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या काही भागात जवस व करडई/करडी आणि दक्षिण भारत व समुद्र किनारपट्टीलगतच्या भागात खाेबरेल तेलाचा खाण्यासाठी वापर केला जाताे. खाद्यतेलाची ही विभागणी भारताच्या विविध भागातील जैवविविधता व वातावरणावरून नैसर्गिकरीत्या झाली आहे.पारंपरिक तेलबियांसह सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण ३५ ते ४५ टक्के असून, साेयाबीनमध्ये ते १२ ते १४ टक्के असते. त्यामुळे या तेलबियांपासून तेल काढणे कमी खर्चाचे आहे. पूर्वी भारतात पारंपरिक तेलबियांपासून घाण्याच्या मदतीने तेल काढले जायचे. या तेलाचा दैनंदिन वापर रिफाइंड तेलाच्या तुलनेत अर्धा असताे. ते तेव्हापासून आतापर्यंत आराेग्यवर्धक ठरले आहे.वाढती मागणी, घटते उत्पादन व दुष्परिणामवाढत्या लाेकसंख्येमुळे खाद्यतेलाची मागणी वाढत आहे. स्वस्तात तेल मिळावे म्हणून तेलबियांचे दर नियंत्रित केले जातात. तेलबियांना समाधानकारक दर मिळत नसल्याने त्यांचे लागवड क्षेत्र कमी हाेऊन उत्पादन घटत आहे. मग, खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी रिफाइंड व त्यात पामतेल मिसळण्याला तसेच मानवी खाद्य व तेलबिया नसलेल्या साेयाबीन तेल उत्पादन व ते खायला वापरण्यासाठी सरकारने परवानगी दिली. परंतु, त्याचे मानवी आराेग्यावर काेणते दूरगामी दुष्परिणाम हाेतात, याचा विचार कुणीही केला नाही.आराेग्यापेक्षा चवीला महत्त्वपारंपरिक तेलबियांना स्वत:ची स्वतंत्र चव व गंध आहे. बहुतांश मंडळी चव व गंधामुळे घाण्याचे तेल न वापरता चव व गंधरहित रिफाइंड तेल वापरतात. तेलातील चव, गंध व चिकटपणा कमी करण्यासाठी ते ब्लिचिंग करून त्यात घातक रसायने मिसळली जातात. मानवी आराेग्याला आवश्यक असलेले घटक काढलेले खाद्यतेल केवळ चवीमुळे वापरले जाते.पारंपरिक तेलातील पाेषक घटकजवस तेलामध्ये ओमेगा-३, ओमेगा-६, मेदाम्ल, अँटिऑक्सिडंट, आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. करडई तेलात ओलेइक आम्ल, लिनोलिइक आम्ल व प्रथिने, शेंगदाणा तेलात ऊर्जा, चरबी, संतृप्त चरबी, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ई, फायटोस्टेरॉल्स व प्रथिने, तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व प्रोटीन तसेच माेहरीच्या तेलात ऊर्जा, ओमेगा-६, लिनोलिक ॲसिड, मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, संतृप्त चरबी, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रिफाइंड तेलात यातील बहुतांश घटक काढले जातात.किती तेल खावेएका संशाेधनानुसार पुरुषांनी दिवसभरात ३० ग्रॅम व महिलांनी २० ग्रॅमपेक्षा अधिक तेल खाणे टाळले पाहिजे. कारण तेलामधील फॅट हे फॅटी ॲसिडच्या कणांनी बनलेले असते. सिंगल बाँडने जोडलेल्या फॅटी ॲसिडला सॅच्युरेटेड फॅट आणि डबल बाँडने जोडलेल्या फॅटी ॲसिडला अनसॅच्युरेटेड फॅट असे संबाेधले जाते. फॅटी ॲसिड रक्तात थेट विरघळतात व थेट यकृतात जातात. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्पआरोग्य