Lokmat Agro >शेतशिवार > पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार

पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार

The crop insurance amount of the farmers in the first phase will be credited to the account | पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार

पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार

खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार

खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार

शेअर :

Join us
Join usNext

बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या ७२ तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाइन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहेत. ऑफलाइन शेतकऱ्यांना  खरिपाच्या पीकविम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या शेतकऱ्यांना आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सोयाबीनचे भाव गेले तळाला; उत्पादन खर्च ही हाती पडेना

दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्याला शंभर टक्के पीकविम्याची नुकसानभरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे; परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या २२ हजार ५२४ शेतकऱ्यांचाच यात समावेश केला होता. त्यानंतर पीकविमा कंपनीने एकाच गटातील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविले होते.

पीकविमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती न दिल्याने व महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्यामधून अपात्र करण्यात आल्याचे पत्र दिले होते. परंतु, याबाबत पीकविमा कंपनीला उलटटपाली पत्र देऊन अपात्रतेची ठोस कारणे कळविण्यात यावीत, असे पत्र दिले आहे. त्याचे अद्यापही उत्तर आले नाही. - मदन सिसोदिया, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव

Web Title: The crop insurance amount of the farmers in the first phase will be credited to the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.