Lokmat Agro >शेतशिवार > स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail | स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे.

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

उदगाव : गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनाला यश आल्यामुळे आता कारखानदार पैसे देत आहेत, मात्र त्यांची संख्या कमी आहे.

गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन दोनशे रुपये द्यावा मगच कारखाने सुरू करावीत, अशी मागणी स्वाभिमानी योतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वाभिमानीचे १० ते १२ आमदार विधानसभेत जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डन सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णाप्पा पांदारे होते, राजाराम देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मिलिंद साखरपे यांनी केले.

राजू शेट्टी म्हणाले, येथून पुढे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, असंघटित कामगार, ऊस वाहतूकदार, महावितरणचे कंत्राटी कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी डाटा एन्ट्री करणारे कर्मचारी यांच्यासाठी आलेखाने उभारणार आहे.

राज्याला त्यासाठीच परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प आहेत. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नसून उद्योगपतीच्या बाजूने आहे.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, चळवळीतील ताकद व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकते, शेतकरी संघटित करण्याचे काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व हारे साथ आकत्रित जनतेसमोर सक्षम पर्याय उभा केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, राजेंद्र  गड्ड्याणवार, पुरंदर पाटील, भागवत जाधव, जर्नादन पाटील, सचिन शिंदे, अजित पवार, विठ्ठल मोरे, धनाजी पाटील, जयकुमार कोले, राजगोंडा पाटील, सुभाष शेट्टी, भीमगोंड बोरगावे, रामचंद्र शिंदे यांची भाषणे झाली. विक्रम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.