कोल्हापूर: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठीची वीज मोफत मिळणार आहे. सरसकट सर्व कृषी पंपधारकांना माफी मिळणार नाही. साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांचे वीज बिल माफ होणार आहे.
याची अंमलबजावणी शासनाच्या आदेशानंतर होणार असल्याचे महावितरण प्रशासनाचे म्हणणे आहे. संबंधित कृषी पंपधारकांना अंमलबजावणी आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सात एचपीपर्यंतच्या सौर ऊर्जेवरील कृषी पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही विविध योजनांतून सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवल्यास कृषी पंपाची वीज मोफतच मिळत होती.
आता शासन योजनांचा विस्तार करीत आहे. यामुळे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपाची संख्या आता वाढणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
कृषीपंपांना मोफत वीजसौर ऊर्जेवरील कृषी पंपांना मोफत वीज मिळणार आहे. जे शेतकरी सौर ऊर्जेचे पॅनेल उभारणार नाही. त्यांना नियमित वीज बिल भरावे लागणार आहे.
कृषी मीटर देण्याची मागणी- कृषी पंपाचे वीज मीटर खराब झाले असल्यास नवीन मीटरसाठी अर्ज केल्यानंतरही महावितरण मीटर देत नाही. अंदाजे वीज बिल दिले जाते.- बिल वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे महावितरणने मागणी केलेल्या सर्व कृषी पंप ग्राहकांना मीटर द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
अधिक वाचा: Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा