Lokmat Agro >शेतशिवार > संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या दुष्टचक्रात, आठही जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत!

संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या दुष्टचक्रात, आठही जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत!

The entire Marathwada is in a vicious cycle of drought, the income of all eight districts is within 50 percent! | संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या दुष्टचक्रात, आठही जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत!

संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या दुष्टचक्रात, आठही जिल्ह्यांची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत!

मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत ...

मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत ...

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांतील खरीप हंगाम पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून गेला. विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आली असून, दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मागील वर्षी सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान केले. त्यापोटी शासनाने २७०० कोटींची घोषणा केली. त्यातील सुमारे १७०० कोटी सततच्या पावसाच्या नुकसानीचे असून, ते पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यातच मार्च-एप्रिल २०२३ मधील अवकाळी पाऊस, सरस्त्या वर्षातील पावसाळ्यात दोन जिल्ह्यांत अतिवृष्टी व सहा जिल्ह्यांत महिनाभराचा पावसाचा खंड, पुढे रब्बी हंगामात अवकाळी पिकांनी नुकसान केले असून, त्यासाठी भरपाईचा अद्याप काहीही निर्णय नाही, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, शासनाकडून मदतीचा ओघ विलंबाने होत असल्यामुळे शेतकरी आर्थिककोंडीत सापडला आहे. दरम्यान, विभागातील ७६ तालुक्यांतील सर्व गावांतील अंतिम पैसेवारीनुसार खरीप हंगामाचे उत्पादन घटले आहे.

आणेवारी, पैसेवारी म्हणजे काय? दुष्काळाशी त्याचा कसा संबंध?

किती मदत अपेक्षित?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२३ कोटी, जालना ११५ कोटी, परभणी ९ कोटी, हिंगोली १० कोटी, नांदेड ५ कोटी, लातूर १६ लाख, बीड सव्वा लाख, धाराशिव अडीच कोटींचा मदत निधी अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर २६३९३४

जालना १९१२१९

परभणी २५७४८७

हिंगोली २३१७८७

नांदेड ३७९१

लातूर ६५५

बीड १५

धाराशिव १९१२

साडेनऊ लाचा शेतकऱ्यांना फटका

मराठवाड्यात नोव्हेंबर २०२३ महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचा विभागातील ९,५०,८३० शेतकऱ्यांना फटका बसला. ४ लाख ८० हजार ३५१ हेक्टरवरील रब्बी, फळपीके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. मराठवाड्याला २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर काळात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले.

 

Web Title: The entire Marathwada is in a vicious cycle of drought, the income of all eight districts is within 50 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.