राज्यात यंदा पावसाची तूट सरासरीच्या १४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने अनेक भागांत स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाड्याच्या धरणांतीलपाणीसाठयाची पातळी ३७ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, राज्यात ९३९ वाडचा आणि ३१६ गावांना आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. राज्यातल्या धरणातील पाणीसाठाही मागील वर्षीच्या तुलनेत खाली आल्याने दुष्काळाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. स्थानंतर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १७८ तालुक्यातील २४५ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे पुढील काही दिवसांत आणखी महसुली मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वाड्यावस्त्यांत आतापासूनच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
राज्यात लहान-मोठी मिळून २ हजार ९९४ धरणे आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेला ७०.२८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता.
छत्रपती संभाजीनगरमधील धरणांमध्ये किती पाणीसाठा?छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रकल्पांची संख्या ४४ आहे. या धरणातील पाणीसाठा ४३/५० टक्क्यांवर आला आहे. या जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाच्या सुमारे ८१ धरणामधील पाणीसाठा ३०.७ टक्क्यांवर आला आहे. लहान धरणांची संख्या ७९५ आहे. पण या सर्व प्रकल्पामधील पाणीसाठा २६.२५ टक्क्यांवर आला आहे.
विदर्भ- मराठवाड्यात काय स्थिती?
- नागपूर मधील 383 धरणांमध्ये ७३.५८ टक्के पाणीसाठा, तर अमरावतीच्या 261 धरणांमध्ये 79.67% पाणीसाठा
- छत्रपती संभाजी नगर 920 धरणांमध्ये 37.49% पाणीसाठा
मुंबईतील धरणांचा पाणीसाठा
मध्य वैतरणा 65.55%तानसा 87.48%भातसा 89.43%मोडक सागर 90.1%
नाशिक, पुण्यातील धरणांची काय स्थिती?
नाशिक मधील 537 धरणांमध्ये 70.6% पाणी शिल्लक आहे. पुण्यातील ७२० धरणांमध्ये ७६.२० टक्के पाणीसाठा असून कोकणातील 173 धरणांमध्ये 87.29 टक्के पाणीसाठा आहे.