Lokmat Agro >शेतशिवार > शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली

शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली

The farmpond saved farmer; vegetable cultivation doubled, about a thousand acres of agriculture under irrigation | शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली

शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली

फुलंब्री तालुक्यात ५०० शेततळे ठरताहेत वरदान

फुलंब्री तालुक्यात ५०० शेततळे ठरताहेत वरदान

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात 'मागेल त्याला शेततळे' योजनेचा फायदा घेत ५०० शेततळे तयार झाला असून यातून एक हजार एकर कोरडवाहू शेती संरक्षित ओलिताखाली आली आहे. यातून शेतकरी नगदी पिके घेत असून यातून खडकाळ जमिनीवरही हिरवी शेती करणे शक्य होत असल्याने शेततळे वरदान ठरत आहेत.

तालुक्यात मागील दोन वर्षांत भाजीपाला लागवडीच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने मागेल त्याला शेततळे योजना सुरू आहे. याचे नाव बदलून आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असे करण्यात आले आहे. यात पूर्वीप्रमाणेच लाभ दिला जातो. ग्रामीण भागातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी म्हणून कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

कोरडवाहू जमिनीत बागायती करणे शक्य

या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होत आहे. फुलंब्री तालुक्यात गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन आपल्या कोरडवाहू जमिनीला बागायती करण्याचे काम सुरू केले आहे. विहिरीचे पाणी कमी पडले तर या शेततळ्याच्या माध्यमातून नगदी पिके काढून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे धोरण आखले आहे. शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाने वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची साठवण करण्यासाठी शेततळे करणे आवश्यक झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशावेळी ही शेततळे वरदान ठरतात. 

उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा?

शेततळ्याचे सात सूत्री फायदे

पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. आपत्कालीन स्थितीत पिकाला पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध राहते, पूरक सिंचनासाठी पिकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते, चिभड व पाणथळ जमीन सुधारण्यासाठी शेततळ्यांच्या चांगला उपयोग होतो, मत्स्यसंवर्धन करून उत्पादन काढले जाऊ शकते, पिकावर औषधी फवारणी करण्यासाठी पाणी मिळते.

सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

अर्ज करताच ८ दिवसांत मिळते शेततळे

 या योजनेत अर्ज दाखल केला तर आठच दिवसांत मंजुरी मिळते. यामुळे शेततळ्यांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, शेतीपूरक मत्सव्यवसाय, फळबाग यांच्यासाठी शेततळे वरदान ठरत आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली.

Web Title: The farmpond saved farmer; vegetable cultivation doubled, about a thousand acres of agriculture under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.