यंदा सर्वत्र दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेकांना पाणी टंचाई आणि चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे चार्याच्या किमतीत देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे अनेक शेतकरी आपआपल्या पशुधनाकरिता चार्याचे नियोजन व साठवणूक करत आहे. मात्र अशातच राज्यात चारा चोरी झाल्याची घटना घडल्याने आता चारा सुध्दा चोरी होईल? अशी भिती शेतकर्यांत दिसून येत आहे.
हिंगोली येथील शासकीय पशू पैदास प्रक्षेत्राच्या १०१ हेक्टर शेतजमिनीवरील कापून ठेवलेला ज्वारीचा कडबा चोरट्यांनी लंपास केला. ही घटना हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात २५ मार्च रोजी सकाळी सकाळी ७:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
तालुक्यातील बासंबा व पिंपरखेड शिवारातील गट क्र. १९९ मध्ये शासकीय पशू पैदास प्रक्षेत्र कार्यालयाची १०१ हेक्टर शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये पशुखाद्य म्हणून चारा पीक घेतले जाते. २४ मार्च रोजी बासंबा शिवारातील ६ एकरवरील ज्वारीचा चारा कापून शेतात पेंड्या बांधून ठेवला होता.
२५ मार्च रोजी मुकादमाने शेतात जाऊन पाहणी केली असता कापून ठेवलेला ३० हजार रुपये किमतीच्या ७ टन ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्या चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. बाळासाहेब डाखोरे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
ना दुष्काळाची चिंता ना अवकाळीचा फटका; आता वर्षभर पुरेल हिरवा चारा
उधारीत पाणी दिले नाही, काठीने मारहाण
- उधारीत पाण्याची बॉटल का देत नाही या कारणावरून एकास काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना सेनगाव तालुक्यातील जांब आंध शिवारात २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
- याप्रकरणी सोपान विठ्ठल साबळे यांच्या फिर्यादीवरून विजू परसराम साबळे व एका महिलेविरुद्ध औंढा ना. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सोपान साबळे यांचा भाऊ गणेश हा शेताच्या रोडला पानटपरी चालवतो. यावर उधारीमध्ये पाण्याची बॉटल का देत नाही यावरून विजू साबळे याने शिवीगाळ केली.
- याबाबत सोपान यांनी जाब विचारला असता विजू साबळे याने काठीने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.