Join us

The ginger crop flourished in less rain : कमी पावसात अद्रक पीक बहरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:35 AM

The ginger crop flourished in less rain : अद्रक पिकाकडे शेतकर्‍यांचा कल वाढतोय. कमी पावसात जास्त उत्पन्न् देणारे पीक असल्याने सध्या बाजारात प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव. 

दत्ता मोरस्कर

मराठवाडयात अजूनही अपेक्षित पाऊस नाही त्यामुळे कन्नड तालुक्यातील वासडी परिसरातील शेतक-यांनी अद्रक पीक घेतले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अद्रकचे लागवड क्षेत्र या परिसरात वाढताना दिसते आहे. 

अद्रकाचे बेणे प्रतिक्विंटल अकरा ते बारा हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांकडूनच खरेदी केले जात आहे. साधारणत: एका एकरात अद्रकाचे बेणे आठ क्विंटल लागते त्यासाठी ८८ हजार, शेणखत दहा ट्रॉली लागत असून त्यासाठी ३० हजार रुपये, रासायनिक खताचे तीन डोस देण्याकरिता २५ हजार रुपये, फवारणीकरिता औषधी खर्च २० हजार रुपये येत आहे.

मात्र शेती मशागत, मजुरीचा खर्च यातून वजा  करावा लागतो. तर अद्रक काढणीचा खर्च व्यापारी करत असून, ते शेतातून अदक काढून, त्याला धुऊन मार्केटला घेऊन जातात.

त्यामुळे सध्या बाजारात प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव अद्रकाला मिळतोय. त्यामुळे वासडीसह साखरवेल, खातखेडा, निंभोरा, तपवन, पळशी परिसरात अद्रक लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत रामनगर येथील  म्हणाले, 

अद्रक पीक चांगले उगवले

अद्रक पिकाची दीड एकर क्षेत्रावर लागवड केली असून पिकाची उगवण क्षमता चांगली आहे. पाऊस कमी असला तरी नेमका आणि या पिकाला हवा तेवढाच तो पडत आहेत्यामुळे परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांचे अद्रक पीक अपेक्षेप्रमाणे चांगले उगवले आहे.  - नरहरी नलावडे, शेतकरी.

भरपूर उत्पादन होणार

मी एक एकर क्षेत्रावर अद्रक लावले आहे. या पिकाचे कोंब चांगले उगवले असून त्याचे यंदा भरपूर उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. - निसार मुक्तार शेख, शेतकरी.

एकरी असा येतो खर्च

एका एकरात अद्रकाचे बेणे आठ क्विंटल लागत असून त्यासाठी ८८ हजार, शेणखत दहा ट्रॉली लागत असून त्यासाठी ३० हजार रुपये, रासायनिक खताचे तीन डोस देण्याकरिता २५ हजार रुपये, फवारणीकरिता औषधी खर्च २० हजार रुपये येत आहे; मात्र शेती मशागत, मजुरीचा खर्च यातून वजा करावा लागतो. तर अद्रक काढणीचा खर्च व्यापारी करत असून, ते शेतातून अद्रक काढून, त्याला धुऊन मार्केटला घेऊन जातात. त्यामुळे यंदा चांगले पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे.  - भगवान जाधव, अद्रक उत्पादक.

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसमराठवाडाशेतकरीपीक व्यवस्थापनबाजारकन्नड